India vs New Zealand T20 : भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात रांचीच्या जेएससीए मैदानात सुरु पहिला टी20 सामन्यात भारताचा युवा अष्टपैलू क्रिकेटर वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) याने एक अफलातून झेल पकडल्याचं पाहायला मिळालं. न्यूझीलंडचे पहिले दोन्ही विकेट्स वॉशिंग्टन सुंदर यानेच घेतले (बातमी लिहीपर्यंत) आहेत. सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर सुरुवातीच्या काही षटकांत वेगवान गोलंदाजांना थोडा चोप मिळाला, पण सुंदरने गोलंदाजीला मैदानात येत दमदार असे दोन विकेट्स घेतले. त्याने सर्वात आधी फिन अॅलन (35) याला सूर्यकुमारच्या हाती झेलबाद करवलं. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या मार्क चॅपमनला सुंदरने खातंही उघडू दिलं नाही. शून्य धावावर मार्कला बाद करताना सुदंरनेच गोलंदाजी करत एक सुंदर अशी डाईव्ह मारत झेलबाद केलं. सुंदरनं घेतलेल्या या कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावरही तुफान व्हायरल होत असून सर्वजण त्याचं कौतुक करत आहेत.


पाहा VIDEO-






आजचा सामना होणाऱ्या रांचीच्या मैदानात आजवर खेळल्या गेलेल्या 28 T20 सामन्यांमध्ये, फक्त एकदाच प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला 200 च्या वर धावा करता आल्या आहेत. पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 160 च्या मध्यभागी आहे. त्यामुळे पाठलाग करणाऱ्या संघांला अधिक फायदा मिळू शकणार असल्याने गोलंदाजीचा निर्णय भारतीय संघानं घेतला आहे. भारतीय संघाचा विचार करता पृथ्वी शॉ बऱ्याच काळानंतर मैदानात परतला असला तरी त्याला अंतिम 11 मध्ये संधी मिळालेली नाही. विशेष म्हणजे कुलदीप यादवसह वॉशिंग्टन सुंदर आणि दीपक हुडा असे तीन फिरकी गोलंदाजी करु शकणारे गोलंदाज मैदानात आहे. तर सलामीला ईशान किशन, शुभमन गिल हे दोघे येणार आहेत. याशिवाय राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार आणि हार्दिक मधल्या फळीत असणार आहेत. तसंच शिवम मावीसह अर्शदीप सिंह हे वेगवान गोलंदाज मैदानात असतील. दुसरीकडे न्यूझीलंड संघाने एकदिवसीय संघातीलच बहुतांश खेळाडू मैदानात आहेत. नेमकी दोन्ही संघाची प्लेईंग कशी आहे पाहूया...


भारतीय संघ - ईशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, कुलदीप यादव, उमरान मलिक, अर्शदीप सिंग


न्यूझीलंडचा संघ - फिन ऍलन, डेव्हॉन कॉन्वे (यष्टीरक्षक), मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, जेकब डफी, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर


हे देखील वाचा-