India vs New Zealand T20 : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात पहिला टी20 सामना रांचीच्या जेएससीएस मैदानात सुरु होत असून नुकतीच नाणेफेक पार पडली आहे. सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली असून टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रांचीमधील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अधिक फायदेशीर नाही. याठिकाणी फिरकीपटूंना अधिक फायदा मिळत असल्याचं दिसून आलं आहे. पण खेळपट्टीची एकूण परिस्थिती पाहता फलंदाजांना अधिक फायदा होतो. विशेष म्हणजे, या मैदानावर खेळल्या गेलेल्या 28 T20 सामन्यांमध्ये, फक्त एकदाच प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला 200 च्या वर धावा करता आल्या आहेत. पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 160 च्या मध्यभागी आहे. त्यामुळे पाठलाग करणाऱ्या संघांला अधिक फायदा मिळू शकणार असल्याने गोलंदाजीचा निर्णय भारतीय संघानं घेतला आहे. संघाचा विचार करता भारतीय संघात एकदिवसीय सामन्यांतील काही खेळाडूंसोबत इतरही नव्या खेळाडूंना संधी दिली आहे. यामध्ये राहुल त्रिपाठी,  दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, अर्शदीप सिंग या सारख्यांचा समावेश आहे. न्यूझीलंडच्या संघातही अधिक खेळाडू एकदिवसीय संघातील आहेत.






कसे आहेत दोन्ही संघ?


भारत- ईशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, कुलदीप यादव, उमरान मलिक, अर्शदीप सिंग


न्यूझीलंड - फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, जेकब डफी, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर


भारताचं पारडं जड


रांचीच्या जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियमवर भारतीय संघाचा टी-20 रेकॉर्ड खूप मजबूत आहे. या मैदानावर टीम इंडिया आतापर्यंत टी-20 मध्ये अजिंक्य आहे. भारताने रांचीमध्ये तीन सामने खेळले असून ते जिंकण्यात त्यांना यश आले आहे. या मैदानावर भारतीय संघाने श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा पराभव केला आहे. सध्या भारताचा T20 संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. ज्यामुळे न्यूझीलंडला भारताची विजयी मोहीम रोखणं सोपं असणार नाही. 


हे देखील वाचा-