Ind vs NZ 1st T20 Live Updates: सावई मानसिंह स्डेडिअमवर (Sawai Mansingh Indoor Stadium) न्यूझीलंडविरुद्ध आज खेळण्यात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतानं (India Vs New Zealand) विजय मिळवलाय. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या संघानं भारतासमोर 165 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात भारतानं 5 विकेट्स राखून न्यूझीलंडला पराभूत केलंय. या विजयासह भारतानं 3 टी-20 सामन्याच्या मालिकेत 1-0 नं आघाडी घेतली.


नाणेफेक गमावून न्यूझीलंडच्या संघाकडून मैदानात आलेल्या मार्टिन गप्टिल (42 बॉल 70 धावा), डॅरिल मिशेल (1 बॉल 0 धाव), मार्क चॅपमन (50 बॉल 63 धावा), ग्लेन फिलिप्स (3 बॉल 0 धाव), टिम सेफर्ट (11 बॉल 12 धावा), रचिन रवींद्र (8 बॉल 7 धावा), मिचेल सँटनर (4 बॉल 4 धावा, नाबाद) आणि टिम साउथी (1 बॉल 0 धाव). ज्यामुळं न्यूझीलंडच्या संघाला 20 षटकात 6 विकेट्स गमावून 164 धावा केल्या. भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि आर अश्विन यांना प्रत्येकी दोन-दोन विकेट्स प्राप्त झाले. तर, दिपक चहर आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येक एक-एक विकेट्स मिळाली आहे. 


या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघाला चांगली सुरुवात झाली. केएल राहुल (14 बॉल 15 धावा), रोहित शर्मा (36 बॉल 48 धावा), सुर्यकुमार यादव (40 बॉल 62) धावा, रिषभ पंत (17 बॉल 17 धावा), श्रेयस अय्यर (8 बॉल 5 धावा), व्यंकटेश अय्यर (2 बॉल 4 धावा) आणि अक्षर पटेलनं नाबाद 1 धाव केली. ज्यामुळं भारतीय संघाला 5 विकेट्सनं विजय मिळवता आलाय. न्यूझीलंडकडून ट्रेन्ट बोल्टनं 2 विकेट्स घेतल्या. तर, टीम साऊथी, मिचेल सॅंटनर आणि डॅरिल मिशेल यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



हे देखील वाचा-