Hardik Pandya IPL Salary: भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या खूप चर्चेत आहे. दरम्यान, सीमाशुल्क विभागानं सोमवारी मुंबई विमानतळावर हार्दिक पांड्याची दोन महागडी घड्याळं जप्त केल्याची बातमी प्रसारमाध्यमांत झळकत होती. त्यानंतर हार्दिकनं स्वत: याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. हार्दिक पांड्या भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याला बीसीसीआय (BCCI) व्यतिरिक्त भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगमधूनही (IPL) चांगली रक्कम मिळते.
हार्दिकला आयपीएलच्या प्रत्येक हंगामात 11 कोटी मानधन मिळतं. तर, त्याचा भाऊ कृणाल पांड्याला 9 लाख मानधन मिळतं. त्यांना एकूण 20 कोटी मिळतात, असे हार्दिक पांड्यानं एका मुलाखतीत सांगितलं होतं. हार्दिक पांड्यानं 2016 साली आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. त्यावेळी त्याला 10 लाख रुपये मिळायचे, असंही त्यानं म्हटलं होतं. हार्दिक पांड्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. हार्दिकनं मुंबईसाठी आतापर्यंत 92 सामने खेळले आहेत. त्याला आयपीएल 2021 मध्ये 11 कोटी रुपये मानधन मिळालं.
महत्वाचे म्हणजे, हार्दिक पांड्याला आयपीएल 2014 च्या ऑक्शनमध्ये कोणत्याही फ्रँचायझीनं विकत घेतलं नव्हतं. या ऑक्शनमध्ये त्याची मूळ किंमत 10 लाख इतकी होती. मात्र, हार्दिकचं 2015 मध्ये नशीब उघडलं आणि मुंबईच्या संघानं त्याला 10 लाखांच्या मूळ किंमतीत विकत घेतलं. या हंगामात हार्दिक पांड्यानं स्फोटक फलंदाजीने निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतलं. त्यानंतर 2016 मध्ये त्याला भारतीय संघाकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-
- Hardik Pandya : कस्टमच्या ताब्यात असणाऱ्या घड्याळावर हार्दिक पांड्याचं स्पष्टीकरण, जाणून घ्या काय म्हणाला?
- T20 Ind vs NZ : राहुल द्रविड 'इन अॅक्शन', सामना सुरु होण्यापूर्वी केली खेळपट्टीची पाहणी
- Champions Trophy 2025: भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार की नाही? क्रीडा मंत्री म्हणाले...