Ind vs NZ 1st T20 Live Updates: न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा 5 विकेट्सनं विजय

Ind vs NZ 1st T20 Live Updates: टी-20 विश्वचषकातील अपयशाची मरगळ झटकून भारतीय क्रिकेट संघ नवीन सुरुवात करणार आहे.

abp majha web team Last Updated: 17 Nov 2021 10:47 PM
न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा 5 विकेट्सनं विजय

न्यूझीलंडविरुद्ध सावई मानसिंह स्डेडिअमवर खेळण्यात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतानं (India Vs New Zealand) विजय मिळवलाय. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर न्यूझीलंडच्या संघानं 20 षटकात 5 विकेट्स गमावून 164 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतानं 7 विकेट्स राखून न्यूझीलंडला पराभूत केलंय. या विजयासह भारतानं 3 टी-20 सामन्याच्या मालिकेत 1-0 नं आघाडी घेतली.

रोहित शर्माचं अर्धशतक हुकलं

न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात रोहित शर्माचं 2 धावांनी अर्धशतक हुकलं आहे. मिचेल सॅंटनरच्या गोलंदाजीवर रोहित शर्मानं त्याची विकेट्स गमावली आहे. भारताचा स्कोर- 109/2 (13.2)

न्यूझीलंडचं भारतासमोर 165 धावांचं लक्ष्य

टी-20 मालिकेतील पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं भारतासमोर 164 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे. 

पहिला विकेट गमवल्यानंतर न्यूझीलंडची संयमी खेळी

टी-20 मालिकेच्या पहिल्या सामन्यात टॉस गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडनं पहिल्याच षटकात विकेट्स गमावला. मात्र, त्यानंतर मार्क चापमॅन आणि मार्टिन गप्टीलनं डाव सावरलाय. न्यूझीलंडचा स्कोर- 60/1 (8.4)

भुवनेश्वर कुमारची दमदार गोलंदाजी, पहिल्याच षटकात डॅरिल मिशेलला माघारी धाडलं

न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात भारताची सुरुवात चांगली झाली आहे. भारताकडून पहिल्याच षटकात गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं न्यूझीलंड सलामीवीर डॅरिल मिशेलला माघारी धाडलंय. न्यूझीलंडचा स्कोर- 1/1 (0.5)

भारतानं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात भारतानं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

पार्श्वभूमी

Ind vs NZ 1st T20 International, Jaipur: टी-20 विश्वचषकातील अपयशाची मरगळ झटकून भारतीय क्रिकेट संघ नवीन सुरुवात करणार आहे. भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात आज पहिला टी-20 सामना खेळला जाणार आहे. जयपूरच्या सावई सवाई मानसिंग स्टेडियमवर (Sawai Mansingh Indoor Stadium) हा सामना पार पडणार आहे. भारतीय टी-20 संघाचं नेतृत्व सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) करणार आहे. तर, केन विल्यमसननं भारताविरुद्ध टी-20 मालिकेतून माघार घेतल्यामुळं न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊथीकडं (Tim Southee) कर्णधारपद सोपवण्यात आलंय. टी-20 फॉर्मेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारतानं आतापर्यंत खराब कामगिरी केलीय. मात्र, न्यूझीलंडविरुद्ध जयपूरमध्ये होणाऱ्या टी-20 मालिकेत भारतीय संघ वर्चस्व गाजवण्याची शक्यता आहे.

 

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने पुरेशी विश्रांती न मिळाल्यामुळं टी-20 मालिकेतून माघार घेतली. त्यामुळं भारताविरोधात न्यूझीलंड संघाचं नेतृत्व वेगवान गोलंदाज टिम साऊदी करणार आहे. डेवॉन कॉन्वेसुद्धा दुखापतीमुळं या मालिकेतून मुकणार आहे. यामुळं डॅरेल मिचेल, मार्टिन गप्टिल यांच्यावर फलंदाजीची मदार असेल. लॉकी फर्गुसन यानं दुखापतीनंतर पुनरागमन केल्यामुळं न्यूझीलंडच्या गोलंदाजीची ताकद वाढली आहे.

 

संघ-

 

भारतीय संघ: 

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत विकेटकिपर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, इशान किशन , व्यंकटेश अय्यर, रुतुराज गायकवाड

 

न्यूझीलंड संघ: 

मार्टिन गप्टिल, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, जेम्स नीशम, टिम सेफर्ट (विकेटकिपर), मिचेल सँटनर, टिम साउथी (कर्णधार), लॉकी फर्ग्युसन, काइल जेमिसन, ट्रेंट बोल्ट, ईश सोधी, टॉड अॅस्टल, अॅडम मिलने

 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना आज (17 नोव्हेंबर) खेळला जाणार आहे. त्यानंतर दुसरा टी-20 सामना 19 नोव्हेंबरला तर, तिसरा टी-20 सामना 21 नोव्हेंबरला होणार आहे. या टी-20 मालिकेतील सर्व सामने जयपूरमध्ये खेळले जाणार आहे.  त्यानंतर 25 नोव्हेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला कसोटी सामना कानपूरमध्ये होणार आहे. तर, दुसरा कसोटी सामना मुंबईत खेळला जाईल.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.