IND vs NZ 1st T20 Live Streaming: भारतीय क्रिकेट संघ (Team India) आजपासून न्यूझीलंड (New Zealand) संघाविरुद्ध टी20 मालिका (IND vs NZ T20 Series) खेळणार आहे. आज भारत (India) विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) पहिला टी20 सामना खेळवला जाणार आहे. भारताने यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीपासून दमदार फॉर्म कायम ठेवला आहे. श्रीलंकेला टी20 मध्ये मात देऊन एकदिवसीय मालिकेत व्हाईट वॉश दिल्यानंतर न्यूझीलंडलाही वन-डे मध्ये व्हाईट वॉश दिला आहे. ज्यानंतर आता टी20 मालिका भारत न्यूझीलंडविरुद्ध आजपासून खेळणार आहे. तर आज होणाऱ्य पहिल्या टी20 या सामन्याची माहिती जाणून घेऊ... 

कधी होणार सामना?

भारत विरुद्ध न्यूझीलंड हा पहिला टी20 (India vs New Zealand 1st T20) आज अर्थात, 27 जानेवारी रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सामना खेळवला जाईल. त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होणार आहे. 

कुठे आहे सामना?

भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिला टी20 सामना रांचीच्या जेएससीए इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर (JSCA International Stadium) खेळवला जाणार आहे.  

कुठे पाहता येणार सामना?

भारत विरुद्ध न्यूझीलंड टी20 सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   

भारताचा टी20 संघ

हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उप कर्णधार), ईशान किशन (विकेटकिपर), शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (विकेटकिपर) , वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार 

भारत विरुद्ध न्यूझीलंड Head to Head

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 22 टी20 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 12 सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंडने 9 सामने जिंकले आहेत. याशिवाय एका सामना बरोबरीत देखील सुटला आहे.

भारत आणि न्यूझीलंड टी20 मालिकेचं वेळापत्रक:

सामना तारीख ठिकाण
पहिला टी-20 सामना  27 जानेवारी 2023 रांची
दुसरा टी-20 सामना 29 जानेवारी 2023 लखनौ
तिसरा टी-20 सामना 01 फेब्रुवारी 2023 अहमदाबाद
 

महत्त्वाच्या इतर बातम्या :