Ind vs Ireland: आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी बीसीसीआयनं (BCCI) बुधवारी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या मालिकेत भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) भारतीय संघाचं कर्णधारपद संभाळणार आहे. या मालिकेसाठी महाराष्ट्राचा फलंदाज राहुल त्रिपाठीला प्रथमच संधी मिळाली आहे. तर यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसनचंही पुनरागमन झालंय. विशेष म्हणजे, आयपीएलच्या पंधराव्या हंगामात राहुल तेवतियानं (Rahul Tewatia) गुजरात टायटन्ससाठी दमदार कामगिरी केली. परंतु, आयर्लंडविरुद्ध मालिकेत संघात स्थान न मिळाल्यानं त्यानं नाराजी व्यक्त करून दाखवली. 


आयपीएल 2022 मध्ये राहुल तेवतियाची दमदार कामगिरी
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात राहुल तेवतियां एकट्याच्या जोरावर गुजरातला अनेक सामने जिंकून दिले आहेत. परंतु, या खेळाडूला अद्याप भारतीय संघात संधी मिळालेली नाही. निवडकर्त्यांच्या निर्णयामुळं निराश झालेल्या तेवतिया यांनी ट्विटरवर आपलं दुःख व्यक्त केलंय.


ट्वीट-



संजू सॅमसनचं पुनरागमन
आयपीएल’मध्ये सनरायजर्स हैदरबादकडून चारशेहून अधिक धावा काढणारा त्रिपाठी हा एकमेव नवा चेहरा या संघात आहे.  याचप्रमाणे राजस्थान रॉयल्सला अंतिम फेरीपर्यंत नेणारा कर्णधार सॅमसनलाही कारकीर्द सावरण्याची आणखी एक संधी मिळालीय. भुवनेश्वर कुमार हा संघाचा उपकर्णधार आहे.


भारतीय संघ-
हार्दिक पांड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), यजुर्वेद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.


हे  देखील वाचा-