IND vs IRE Live : आज भारत आणि आयर्लंड  (India vs Ireland) यांच्यात दुसरा टी20 सामना खेळवला जात आहे. आयर्लंडच्या डबलीन क्रिकेट स्टेडियमवर नुकतीच नाणेफेक पार पडली आहे. यावेळी भारतीय संघाचा कर्णधार हार्दिकने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. एक मोठी धावसंख्या करुन आयर्लंड संघावर दबाव आणण्याची रणनीती हार्दिकची असावी.  


मागील सामनाही याच मैदानावर झाला होता, त्यावेळीही हार्दिकला फलंदाजी घेण्याची इच्छा होती. पण पावसाचं वातावरण असल्यानं त्याने हा निर्णय़ घेतला नव्हता, आज मात्र त्याने प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय़ घेतला आहे. दुसरीकडे आयर्लंडचा कर्णधार प्रथम गोलंदाजीच करु इच्छित असल्याचं त्याने सांगितलं आहे. भारताने संघात तीन बदल केले असून ऋतुराजच्या जागी संजू, आवेशच्या जागी हर्षल आणि चहलच्या जागी बिश्नोई संघात आला आहे. तर नेमकी अंतिम 11 कशी आहे पाहुया...


दोन्ही संघाची अंतिम 11


भारत - ईशान किशन, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या (कर्णधार), दिनेश कार्तिक (विकेटकिपर), अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, रवी बिश्नोई, हर्षल पटेल, उमरान मलिक.


आयर्लंड - पॉल स्टर्लिंग, अँड्र्यू बालबर्नी (कर्णधार), मार्क अडायर, हॅरी टेक्टर, गॅरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, क्रेग यंग, कॉनर ऑफ्लर्ट, अँडी मॅकब्रायन, जोशुवा लिटिल, कोनोर ऑल्फर्ट 


भारत विरुद्ध आयर्लंड Head to Head


भारत आणि आयर्लंड यांच्यात आतापर्यंत 4 टी-20 सामने खेळवले गेले आहे. या सर्व सामन्यात अपेक्षेप्रमाणे भारताचचं पारडं जड दिसून आलं आहे. कारण चार पैकी चारही सामन्यात भारतानं बाजी मारली आहे. तर, आयर्लंड संघाला एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे आता आजचा सामना जिंकून भारत आपला विजयी रथ कायम ठेवायचा प्रयत्न करेल. तर आयर्लंड किमान  आजच्या सामन्यात विजय मिळवून भारताविरुद्ध पहिला-वहिला विजय मिळवू इच्छित असेल


हे देखील वाचा -