IND vs IRE Live : भारत आणि आयर्लंड (India vs Ireland) यांच्यातील पहिल्या सामन्याची सुरुवात होण्यापूर्वी पावसाने हजेरी लावली, ज्यामुळे सामना सुरु होण्यास कमालीचा विलंब झाला आहे. 9 वाजता सुरु होणारा सामना आता 11 वाजून 20 मिनिटांनी होणार आहे. त्याशिवाय 20 च्या जागी 12 षटकचं खेळवली जाणार आहेत. याशिवाय गोलंजदाजांच्या नियमांतही बदल करण्यात आले आहेत. बीसीसीआयने ट्वीट करत ही माहिती दिली आहे.
आजच्या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी पावसाने विश्रांती घेतल्याने नाणेफेक पार पडली. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी घेतली. 'खेळपट्टी पाहता प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय़ आम्ही घेणार होतो. पण वातावरण पाहता प्रथम गोलंदाजी घेणं अधिक फायद्याचं आहे असं स्पष्टीकरण नाणेफेकीनंतर भारताचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याने दिलं.' पण त्यानंतरच पावसाला तुफान सुरुवात झाली. ज्यामुळे सामना सुरु होण्यास बराच वेळ गेला. आता सामना 11 वाजून 20 मिनिटांनी सुरु होत असून 20 जागी 12 षटकं टाकली जातील. तसंच 4 षटकांचा पावरप्ले असणार आहे. तसंच दोन गोलंदाज प्रत्येकी तीन षटकं टाकू शकतात, तर तीन गोलंदाज प्रत्येकी दोन षटकं टाकू शकतात.
अशी आहे दोन्ही संघाची अंतिम 11
भारत - ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या (कर्णधार), दिनेश कार्तिक (विकेटकिपर), अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल,आवेश खान, उमरान मलिक.
आयर्लंड - पॉल स्टर्लिंग, अँड्र्यू बालबर्नी (कर्णधार), मार्क अडायर, हॅरी टेक्टर, गॅरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, क्रेग यंग, कॉनर ऑफ्लर्ट, अँडी मॅकब्रायन, जोशुवा लिटिल, कोनोर ऑल्फर्ट
भारत विरुद्ध आयर्लंड Head to Head
भारत आणि आयर्लंड यांच्यात आतापर्यंत 3 टी-20 सामने खेळवले गेले आहे. या सर्व सामन्यात अपेक्षेप्रमाणे भारताचचं पारडं जड दिसून आलं आहे. कारण तीन पैकी तिनही सामन्यात भारतानं बाजी मारली आहे. तर, आयर्लंड संघाला एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे आता या दोन सामन्यांपैकी आजचा सामना जिंकून भारत आपला विजयी रथ कायम ठेवायचा प्रयत्न करेल. तर आयर्लंड सामन्यात विजय मिळवून भारताविरुद्ध पहिला-वहिला विजय मिळवू इच्छित असेल.
हे देखील वाचा-
- Ranji Trophy 2022 Final : मध्य प्रदेश संघानं रचला इतिहास, मुंबईला मात देत रणजी चषकावर कोरलं नाव
- ENG vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध अद्भुत विजयानंतरही इंग्लंडला मोठा झटका, दंडासह WTC चे गुणही कापणार
- Ind vs Ireland: 'अखेर मेहनतीचं फळ मिळालंच!' भारतीय संघात स्थान मिळालेल्या राहुल त्रिपाठीची प्रतिक्रिया