मुंबई : भारतीय क्रिकेट टीम सध्या अहमदाबादमध्ये इंग्लंड विरोधात टी20 सीरिज खेळत आहे. आज दोन्ही संघांमध्ये या सीरिजमधील चौथा सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यापूर्वी सोशल मीडियावर भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या दरवाजावर लावण्यात आलेली नेम प्लेट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. नेम प्लेटच्या या फोटोमध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मासोबतच त्यांची मुलगी वामिकाचंही नाव लिहिलेलं दिसत आहे.
...म्हणून हॉटेलने घेतला निर्णय
दरम्यान, टीम इंडिया गेल्या सहा महिन्यांपासून अधिक काळ बायो बबलमध्ये आहे. पहिल्यांदा आयपीएल 2020 आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौरा आणि पुन्हा इंग्लंडसोबतची सीरिज. अशातच अहमदाबादमधील ज्या हॉटेलमध्ये टीम इंडिया राहत आहे. तेथील कर्मचाऱ्यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी घरासारखं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच प्रत्येक खेळाडूच्या रुमबाहेर त्यांच्या नावाची नेम प्लेट लावण्यात आली आहे.
हॉटेल व्यवस्थापनाने खेळाडूंना रुम नंबर देण्याऐवजी त्यांच्या रुमच्या दरवाज्यावर त्यांच्या कुटुंबाच्या सदस्यांची नावं लिहिली आहेत. त्यासोबतच त्यांची रूम त्यांच्या घरातील खोलीप्रमाणे डिझाइन करण्याचा प्रयत्न केला आहे.
याचप्रमाणे भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या रूमबाहेर हॉटेल व्यवस्थापनाने जी नेम प्लेट लावली आहे, त्यावर विराह कोहली आणि पत्नी अनुष्का शर्मासोबतच त्यांची मुलगी वामिकाचंही नाव लिहिण्यात आलं आहे.
India Vs Englnad 4th T-20: टीम इंडिया मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी मैदानात उतरणार
आज खेळवण्यात येणार टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड चौथा टी20 सामना
दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा टी20 सामना आज रात्री सात वाजता खेळवण्यात येणार आहे. अहमदाबादमधील मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे हा सामना खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाने इंग्लंडविरोधातील टी20 सीरिजमध्ये आतापर्यंत एका सामन्यात विजय मिळवला आहे. तर इंग्लंडने आतापर्यंत दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकत इंग्लंडसोबत बरोबरी करण्याची संधी टीम इंडियाकडे आहे. तर आजच्या सामन्यात विजय मिळवत ही मालिका खिशात घालण्यासाठी इंग्लंड आज मैदानावर उतरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Ritika Phogat | 'दंगल गर्ल' बबिता फोगाटच्या बहिणीची आत्महत्या, कुस्तीत केवळ एका गुणाने पराभव झाल्याने उचललं टोकाचं पाऊल
- खेळाप्रतीच्या समर्पकतेपोटी बजरंग पुनियाचा मोठा निर्णय
- Road Safety World Series: सचिनची दमदार खेळी, 42 चेंडूत 65 धावा; इंडिया लिजेंड्सची फायनलमध्ये धडक