नवी दिल्ली : अनेकदा एखाद्या गोष्टीप्रती असणाऱी समर्पकता आणि त्या दृष्टीनं निर्धारित करण्यात आलेलं लक्ष्य पाहता काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात येतात. असाच एक मोठा निर्णय कुस्तीपटू बजरंग पुनिया यानं घेतला आहे. सोशल मीडियाच्याच माध्यमातून त्यानं या निर्णयाची माहिती सर्वांना दिली.


आगामी 2021 ऑलिम्पिक स्पर्धेसाठी बजरंगनं सोशल मीडियावरील सर्वच माध्यमांपासून काही काळासाठी पूर्णपणे दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील ही पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा ठरणार आहे, जिथं तो स्पर्धेत सहभागी होताना दिसेल.


'आजपासून मी माझी सर्वच सोशल मीडिया अकाऊंट बंद करत आहे. आता थेट ऑलिम्पिक स्पर्धांनंतरच तुम्हा सर्वांशी भेट होईल. आशा करतो की माझ्यावर असणारं प्रेम तुम्ही असंच कायम ठेवाल. जय हिंद.', असं लिहित त्यानं काही काळासाठी सोशल मीडियाच्या विश्वातून काढता पाय घेतला.





Jasprit Bumrah Marriage | बोहल्यावर चढतोय बुमराह? बहुचर्चित प्रेमप्रकरणांची सुरुये चर्चा


'टाईम्स ऑफ इंडिया'शी त्यानं आपल्या या निर्णयाबाबत संवाद साधताना दिलेल्या माहितीत अर्थात हा कठीण निर्णय असल्याचं सांगितलं. हा निर्णय सोपा नसला तरीही असं काहीतरीह मी पहिल्यांदाच करत आहे, अशी बाब नाही. ज्यावेळी प्रश्न ऑलिम्पिक खेळांचा असेल तेव्हा इतर सर्व गोष्टी नगण्य आहेत. त्यामुळं पुढच्या पाच महिन्यांसाठी मी कोणत्याही प्रकारच्या लक्ष विचलीत करणाऱ्या सोशल मीडियापासून दूर राहून भारतासाठी ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक विजयासाठीचे प्रयत्न करणार आहे, असं तो म्हणाला.


जुलै महिन्यात सुरु होणार ऑलिम्पिक स्पर्धा...


23 जुलै 2021 पासून टोकियोमध्ये ऑलिम्पिक स्पर्धांची सुरुवात होणार आहे. 8 ऑगस्ट 2021 पर्यंत या स्पर्धा सुरु असतील. यंदाच्या वर्षी या स्पर्धेमध्ये एकूण 33 क्रीडाप्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. ज्यामध्ये एकूण 339 पदकं आणि 42 क्रीडास्थानं जगभरातील खेळाडूंच्या प्रतिक्षेत सज्ज असणार आहेत.