India Vs Englnad 4th T-20: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी -20 मालिकेचा चौथा सामना आज खेळवला जाणार आहे. आज सायंकाळी 7 वाजेपासून मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना खेळला जाईल. सायंकाळी साडेसहा वाजता टॉस होईल. कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे अहमदाबादमधील रिकाम्या स्टेडियममध्ये पुन्हा एकदा सामना खेळला जाईल.


पाच सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया सध्या 1-2 ने पिछाडीवर आहे. अशा परिस्थितीत मालिकेतील आव्हान काय राखण्यासाठी टीम इंडियाला सामना जिंकने गरजेचं आहे. तसेच आजचा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्यावर इंग्लंडची नजर असेल. विराट सेनेसाठी या सामन्यातील सर्वात मोठे आव्हान इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजीच्या हल्ल्याशी सामना करणे आहे. याशिवाय सलामीवीर केएल राहुलचा खराब फॉर्मही टीम इंडियासाठी चिंतेचा विषय आहे.


INDvsENG : इंग्लंडचा दणदणीत विजय, बटलरची शानदार खेळी, मॉर्गनचा अनोखा विक्रम!


पराभवानंतर कोहलीकडून बदलाचे संकेत


तिसर्‍या टी -20 मध्ये इंग्लंडने भारताचा सहज पराभव केला. या पराभवानंतर भारतीय कर्णधारविराट कोहलीने चौथ्या टी -20 संघात बदलांचे संकेत दिले होते. कोहली म्हणाला की पुन्हा एकदा संघ निवडीबद्दल विचार करावा लागेल. खरं तर कोहली चौथ्या टी -20 मध्ये सहा गोलंदाजीच्या पर्यायांसह उतरण्याविषयी बोलत होता. टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजी कामगिरीही चिंतेचा विषय आहे. आघाडीचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आपली फॉर्मध्ये नाही. तिसर्‍या टी -20 सामन्यात युजवेंद्र महागडा गोलंदाज ठरला. 


अर्धशतकी खेळीनंतर विराट इशानला म्हणाला, 'ओए... चारो तरफ बॅट दिखा'


सामना रिकाम्या स्टेडियममध्ये खेळला जाईल


हमदाबादमध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा फैलाव होताना दिसत आहे. त्यामुळे हा सामना रिकाम्या स्टेडियममध्ये खेळला जाईल. यापूर्वी तिसर्‍या टी -20  सामन्यातही प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी नव्हती. मात्र मालिकेचे पहिले दोन सामने प्रेक्षकांच्या निम्म्या उपस्थितीसह खेळले गेले. आत वाढत्या संक्रमणामुळे मालिकेचा शेवटचा आणि पाचवा टी -20 देखील प्रेक्षकांविना खेळवला जाणार आहे. 


भारत संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर.


इंग्लंड संघ : इयॉन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, सॅम बिलिंग्ज, जोस बटलर (यष्टीरक्षक), सॅम कुरन, टॉम कुरन, ख्रिस जॉर्डन, लिम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मालन, आदिल राशिद, जेसन रॉय, बेन स्टोक्स , रीस टोपली आणि मार्क वुड.