IND vs ENG Dharamsala Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका (IND vs ENG) आता अखेरच्या टप्प्यात आहे. भारतीय संघाने (Team India) चौथ्या कसोटी सामन्यात (India vs England Test ) विजय मिळवत मालिका 3-1 ने खिशात घातली आहे. आता अखेरचा कसोटी सामना सात मार्चपासून धर्मशाला मैदानात रंगणार आहे. या मैदानावर भारताचा रेकॉर्ड चांगला आहे. या मैदानात भारताचा रेकॉर्ड चांगलाय. एकमेव कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवलाय.  इंग्लंडविरोधात याच मैदानात भारताचा सामना होणार आहे.


एकमेव कसोटीत भारताची बाजी - 


धर्मशालाच्या मैदानात आतापर्यंत फक्त एक कसोटी सामना झालाय. त्यामध्ये भारताने बाजी मारली. 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात या मैदानात सामना झाला होता. भारतीय संघाने हा सामना आठ विकेटने जिंकला होता. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी पहिल्या डावात 300 तर दुसऱ्या डावात 137 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तर भारताने पहिल्या डावात 332 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात 106 धावा करत सामना जिंकला होता.


टीम इंडियासाठी पहिल्या डावात केएल राहुल, चेतेश्वर पुजारा आणि रवींद्र जाडेजा यांनी अर्धशतकं ठोकली. रवींद्र जाडेजा इंग्लंडविरोधातही धर्मशालाच्या मैदानात उतरेल. तो तुफान फॉर्मात आहे, त्याचा फायदाही होईल. रवींद्र जाडेजानं 63 धावांची खेळी केली होती. 


धर्मशालामध्ये इंग्लंड पलटवार करणार का ?


लागोपाठ तीन सामन्यात पराभवाचा सामना करणारा इंग्लंडचा संघ नव्या दमाने मैदानात उतरेल. अखेरचा सामना जिंकून इंग्लंडचा संघ शेवट गोड करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल, याच शंकाच नाही. इंग्लंडच्या अतिआक्रमक बॅझबॉल भारतीय भूमीवर सपशेल अपयशी ठरला. भारताचा हैदराबाद कसोटीमध्ये पराभव करत इंग्लंडनं दणक्यात सुरुवात केली, पण त्यानंतर भारताने पलटवार केला. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने सलग तीन सामन्यात विजय मिळवला. विशाखापट्टणम कसोटीत भारताने 106 धावांनी विजय मिळवला. राजकोट कसोटी सामन्यात 434 धावांनी विजय मिळवला, त्यानंतर रांची कसोटीत पाच विकेटने मात केली. आता अखेरचा सामना जिंकून शेवट गोड कऱण्यासाठी साहेब मैदानात उतरली. तर भारतीय संघही विजयाच्या इराद्यानेच मैदानात उतरेल.


भारत आणि इंग्लंड यांच्यातील अखेरचा कसोटी सामना कधी आहे ?


भारत आणि इंग्लंड यांच्यातील अखेरचा पाचवा कसोटी सामना सात मार्च ते 11 मार्च यादरम्यान होणार आहे. 


पाचवा कसोटी सामना कुठे होणार ?









पाचवा कसोटी सामना किती वाजता सुरु होणार ?


मालिकेतील अखेरचा कसोटी सामना सकाळी 9.30 वाजता सुरु होईल. त्याआधी अर्धा तास नाणेफेक होईल. 


कुठे पाहाल अखेरचा सामना ?


जिओ अॅपवर मोफत सामना पाहता येईल. टिव्हीवर स्पोर्ट्स 18 या चॅनलवर सामना पाहता येईल. त्याशिवाय सामन्यासंदर्भातील सर्व अपडेट एबीपी माझाच्या वेबसाईटवर वाचायला मिळतील. 



आणखी वाचा : 


IND vs ENG : रजत पाटीदारचा पत्ता होणार कट, धर्मशाला कसोटीत स्टार फलंदाजाला मिळणार संधी!


6,6,6,6,6,6,6,6  अवघ्या 33 चेंडूत शतक, रोहित शर्माचा विक्रम मोडला! 


केन विल्यमसन तिसऱ्यांदा बाप, सारानं दिला गोंडस मुलीला जन्म!


IND vs ENG : आर. अश्विन आणि जॉनी बेयरस्टो धर्मशाला कसोटीत शतक निश्चित, मैदानात उतरताच रचणार इतिहास! 


केएल राहुल लंडनमध्ये, धर्मशाला कसोटीत खेळण्यावर प्रश्नचिन्ह!


धोनीच्या रेल्वेतील पहिल्या नोकरीचं अपॉईंटमेट लेटर व्हायरल, तुम्ही पाहिलंत का?


BCCI च्या तंबीनंतर आली जाग, ईशान किशन मैदानावर परतला, पण पहिल्याच सामन्यात फ्लॉप


33 चौकार, 12 षटकार, IPL आधी चेन्नईच्या खेळाडूनं ठोकलं त्रिशतक


BCCI नं फटकारल्यानंतर श्रेयस अय्यरला शाहणपण, मुंबई संघाकडून खेळणार!