MS Dhoni's First Appointment Letter For Indian Railways : भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या (MS Dhoni) संघर्षाची कहाणी अनेक युवा खेळाडूंना प्रेरित करते. धोनीचा क्रिकेटर होण्यापर्यंतचा प्रवास सगळ्या जगाला माहितेय. त्यानं केलेला संघर्ष मोठ्या पडद्यावरही उतरवण्यात आला. यशस्वी क्रिकेटर होण्याआधी धोनी रेल्वेमध्ये टीसी होता, हेही प्रत्येक चाहत्याला माहितेय. त्याच धोनीच्या पहिल्या नोकरीचं अपॉइंटमेंट लेटर (Appointment Letter) सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेय. रेल्वेकडून धोनीला देण्यात आलेल्या या नियुक्ती पत्राची (MS Dhoni Railway Appointment Letter) सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. 


रेल्वेनं एमएस धोनीला दिलेले नियुक्तीचं पत्र (MS Dhoni Railway Appointment Letter) सोशल मीडियावर वाऱ्यासारखं व्हायरल झालेय. चाहत्यांकडून यावर लाईक्स अन् कमेंट्सचा वर्षाव होतोय. या नियुक्तीपत्राला पाहिल्यानंतर धोनीच्या चाहत्यानं एक पोस्ट केली आहे. ट्विटर युजर्सनं म्हटले की, ऐतिहासिक नियुक्तीपत्र... अन्य एका व्यक्तीनं लिहिलेय की... वाह, अद्भुत! दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान रांचीमध्ये नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेदरम्यान धोनीला रेल्वेनं दिलेले नियुक्तीपत्र लाईव्ह दाखवण्यात आलं होतं. 


धोनीचं रेल्वेतील नियुक्तीपत्र व्हायरल - 


@mufaddal_vohra नावाच्या एक्स (आधी ट्विटर) युरर्सनं धोनीला रेल्वेनं दिलेले नियुक्तीपत्र पोस्ट केलेय. त्यानं पोस्ट केलेला हा फोटो सोशल मीडियावर व्हाऱ्यासारखा व्हायरल झालाय. त्याच्या या ट्विटला लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. आतापर्यंत एक लाख 75 हजार जणांनी हे ट्वीट लाईक्स केलेय. तर शेकडो जणांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. दरम्यान, एमएस धोनी खडगपूर रेल्वे स्थानकावर तिकिट कलेक्टर म्हणून कार्यकरत होता. पण क्रिकेटचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धोनीनं ही नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.






आयपीएलमध्ये दिसणार धोनी - 


माजी कर्णधार एमएस धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. धोनी आता फक्त आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. धोनी चेन्नईच्या संघाची धुरा संभाळतो. यंदा आयपीएल 2024 स्पर्धेचा थरार 22 मार्चपासून सुरु होणार आहे. धोनीच्या चेन्नईचा पहिला सामना असेल. धोनीला पुन्हा एकदा मैदानात पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. तीन आठवड्यात आयपीएलचा रणसंग्राम सुरु होणार आहे. धोनी आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. धोनी 22 मार्चपासून अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे. चेन्नईचा पहिला सामना आरसीबीसोबत घरच्या मैदानावर होणार आहे. 


जगातला सर्वात यशस्वी कर्णधार - 


एमएस धोनी याला जगातील सर्वात यशस्वी कर्णधारापैकी एक म्हणून ओळखलं जातेय. धोनीनं भारताला अनेक अशक्यप्राय विजय मिळवून दिलेत. धोनीच्या नेतृत्वात भारताने सर्व आयसीसी स्पर्धेवर नाव कोरलेय. धोनीच्या नेतृत्वात भारताने टी 20 वर्ल्डकप, वनडे वर्ल्डकप आणि चॅम्पियन ट्रॉफीरही नाव कोरलेय. धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघानं अनेक कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थानावरही कब्जा मिळवला होता.  


आणखी वाचा :


BCCI च्या तंबीनंतर आली जाग, ईशान किशन मैदानावर परतला, पण पहिल्याच सामन्यात फ्लॉप


33 चौकार, 12 षटकार, IPL आधी चेन्नईच्या खेळाडूनं ठोकलं त्रिशतक


BCCI नं फटकारल्यानंतर श्रेयस अय्यरला शाहणपण, मुंबई संघाकडून खेळणार!