Sameer Rizvi triple century : आयपीएलच्या 17 व्या हंगामाला (IPL 2024) अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. गतविजेता चेन्नईचा (Chennai Super Kings) पहिलाच सामना रंगणार आहे. त्याआधीच चेन्नईसाठी आनंदाची बातमी आली आहे. चेन्नईच्या (CSK) युवा फलंदाजाने वादळी फलंदाजी करत त्रिशतक ठोकलं. समीर रिजवी (Sameer Rizvi) यानं 33 चौकार आणि 12 षटकारांच्या मदतीने त्रिशतक ठोकलं. त्याच्या या खेळीचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. समीर रिजवी  याला चेन्नईनं नुकत्याच झालेल्या लिलावात 8.40 कोटी रुपये खर्च करुन ताफ्यात घेतलं होतं. 


33 चौकार, 12 षटकार  - 


आयपीएल 2024 आधी चेन्नई सुपर किंग्सच्या युवा फलंदाजानं वादळी खेळी केली. 20 वर्षीय समीर रिजवी यानं सीके नायडू चषकात विस्फोटक फलंदाजी करत त्रिशतक ठोकलं. उत्तर प्रदेश संघाकडून खेळताना समीर रिजवी यानं 266 चेंडूमध्ये 312 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये समीर रिजवी  यानं 33 चौकार आणि 12 षटकारांचा पाऊस पाडला. समीर रिजवी याला चेन्नईनं नुकत्याच झालेल्या मिनी लिलावात खरेदी केले आहे. चेन्नईनं समीर रिजवी  याच्यावर 8.40 कोटी रुपयांची बोली लावली होती. समीर रिजवी हा या लिलावातील सर्वात महागडा अनकॅप खेळाडू ठरला होता. 


समीर रिजवीचं वादळ - 


सीके नायडू ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेशचा अष्टपैलू खेळाडू आणि कर्णधार समीर रिजवी यानं सौराष्ट्राच्या विरोधात वादळी फलंदाजी करत सर्वांचं लक्ष वेधलेय. समीर रिजवी यानं 12 षटकार आणि 33 चौकारांच्या मदतीने त्रिशतक ठोकलं. समीर रिजवीच्या या त्रिशतकाच्या बळावर उत्तर प्रदेश संघानं पहिल्या डावात 746 डावांचा डोंगर उभारला. समीर रिजवी याच्याशिवाय ऋतुराज शर्मा यानं 132 धावांची खेळी केली. 


लिलावात चेन्नईनं कोट्यवधी केले खर्च - 


20 वर्षीय समीर रिजवी याच्यावर चेन्नईनं मोठा डाव खेळला होता. नुकत्याच झालेल्या मिनी आयपीएल लिलावात चेन्नईने समीर रिजवी याला 8.40 कोटी रुपये खर्च करत आपल्या ताफ्यात घेतले. समीर रिजवी याच्यासाठी गुजरात टायटन्स आणि चेन्नई यांच्यामध्ये बोली लागली होती. पण अखेर चेन्नईने यात बाजी मारली. 20 लाख रुपयांची बेस प्राईज असणाऱ्या समीर रिजवी याला चेन्नईने 8.40 कोटी रुपये खर्च करत आपल्या ताफ्यात घेतले. समीर रिजवी यंदाच्या लिलावातील सर्वात महागडा अनकॅप खेळाडू ठरला होता. यूपी टी 20 स्पर्धेत सर्वात वेगवान शतक ठोकत समीर रिजवी प्रसिद्धीझोतात आला होता. 


 चेन्नईचा सलामीचा सामना - 


आयपीएल 2024 ला अवघ्या तीन आठवड्याचा वेळ शिल्लक राहिलाय. 22 मार्च पासून आयपीएलच्या रणसंग्रामाला सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यातील वेळापत्रकही बीसीसीआयकडून जारी करण्यात आलेय. चेन्नईचा पहिलाच सामना आरसीबीसोबत होणार आहे. आयपीएलआधी केलेल्या या वादळी खेळीनंतर चेन्नईच्या प्लेईंग 11 मध्ये समीर रिजवी याला स्थान मिळणार का? याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे. 


आणखी वाचा :


BCCI नं फटकारल्यानंतर श्रेयस अय्यरला शाहणपण, मुंबई संघाकडून खेळणार!