Ishan Kishan BCCI : श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याच्यानंतर ईशान किशन यालाही शाहणपण आलेय. बीसीसीआयनं गंभीर पावलं उचलण्याची तंबी दिल्यानंतर अखेर ईशान किशन यानं मैदानावर परतण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे श्रेयस अय्यर रणजी स्पर्धेत मुंबईकडून खेळताना दिसणार आहे. बीसीसीआयनं काही दिवसांपूर्वी टीम इंडियामध्ये (Team India) समाविष्ठ नसेलेल्या सर्व खेळाडूंनी रणजी ट्रॉफीचे (Ranji Trophy) सामने खेळणं अनिर्वाय असल्याचा फतवा काढला. पण टीम इंडियाचा स्टार खेळाडू ईशान किशननं (Ishan Kishan)  बीसीसीआयच्या (BCCI) फतव्याकडे कानाडोळा केला होता. त्यानंतर बीसीसीआयकडून कठोर कारवाईची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळे ईशान किशन यानं देशांतर्गत स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी ईशान किशन मैदानावर परतला. डीवाय पाटील टी20 स्पर्धेत मंगळवारी ईशान किशन खेळताना दिसला. पण त्याला मोठी खेळी करता आली नाही.


ईशान किशनच्या संघाचा पराभव - 


डीवाय पाटील टी20 स्पर्धेत ईशान किशन आरबीआय संघाचा सदस्य होता. पण त्याला पहिल्याच सामन्यात मोठी खेळी करता आली नाही. अवघ्या 12 चेंडूत 19 धावा करुन ईशान किशन तंबूत परतला.  ईशान किशन याच्या आरबीआय संघाला रूट मोबाइल लिमिटेड संघाने 89 धावांनी पराभूत केले. डीवाय पाटील यूनिवर्सिटी मैदानावर रूट मोबाइल संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात आठ विकेटच्या मोबदल्यात 192 धावा चोपल्या.  आयुष वर्तन यानं 31 चेंडूमध्ये  54 धावा चोपल्या. तर ढेकाले यानं 42 धावांची महत्वाची खेळी केली. 193 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या आरबीआय संघाचा डाव 16.3 षटकात 103 धावांवर आटोपला. रूट मोबाइल संघाकडून बद्री आलम याने 20 धावांच्या मोबदल्यात पाच फलंदाजांना तंबूत धाडलं. 


या सामन्यामध्ये ईशान किशन विकेटकिपिंग करतानाही दिसला. ईशान किशन याच्याशिवाय शाहबाज नदीम, अमित मिश्रा, अंकित राजपूत, ध्रुव शोर्य आणि रियान पराग या स्पर्धेत खेळताना दिसले.  


3 महिन्यानंतर ईशान मैदानावर परतला - 


युवा ईशान किशन तीन महिन्यानंतर क्रिकेटच्या मैदानावर परतला. तो यआधी नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात झालेल्या टी 20 मालिकेत खेळताना दिसला होता. त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळालं होतं. पण मानसिक थकव्याचं कारण देत त्यानं आपलं नावं मागे घेतलं होतं. 






टीम इंडियातून बाहेर, अन् वादाला सुरुवात - 


मानसिक थकव्याचं कारण देत ईशान किशन यानं दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून आपलं नावं मागे घेतलं होतं. पण त्यानंतर तो पार्ट्या करतानाचे फोटो समोर आले. त्यानंतर बीसीसीआयनं तंबी देत ईशान किशन याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याचा सल्ला दिला. त्याशिवाय भारतीय संघातून त्याला वगळण्यात आलं. बीसीसीआयकडून वारंवार तंबी दिल्यानंतरही ईशान किशन रणजी स्पर्धेत खेळताना दिसला नाही. त्यामुळे बीसीसीआयनं कडक कारवाईचा ईशारा दिला होता. अखेर ईशान किशन याला शाहणपण आलं आता त्यानं देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे.  




आयपीएलसाठी देशांतर्गत क्रिकेट न खेळणाऱ्या ईशान किशन याच्याविरोधात बीसीसीआय कठोर कारवाई करण्याच्या विचारात असल्याचं समोर आलं होतं. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, ईशान किशन याला करारातून वगळण्यावर बीसीसीआय विचार करत असल्याचं समोर आले. ही बातमी समोर येताच ईशान किशन यानं देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. 


आणखी वाचा