IND vs ENG Semi Final LIVE : भारत-इंग्लंडची फायनलसाठी लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

IND vs ENG Semi Final LIVE Score: गयानामध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये दुसरा उपांत्य सामना होणार आहे. भारताला 2022 विश्वचषकात इंग्लंडकडून झालेल्या पराभवाची परतफेड करण्याची संधी मिळेल.

नामदेव कुंभार Last Updated: 28 Jun 2024 12:06 AM
भारताची 171 धावांपर्यंत मजल

भारताची 171 धावांपर्यंत मजल, इंग्लंडला विजयासाठी 172 धावांची गरज

भारताला सातवा धक्का

अक्षर पटेलच्या रुपाने भारताला सातवा धक्का बसला. अक्षर पटेल 10 धावांवर बाद झाला.

रविंद्र जाडेजाचा फिनिशिंग टच

रवींद्र जाडेजा आणि अक्षर पटेल यांच्याकडून शानदार फटकेबाजी सुरु आहे.  जाडेजाने जोफ्रा आर्चरची गोलंदाजी धू धू धुतली. 

भारताला मोठा धक्का

हार्दिक पांड्यानंतर शिवम दुबे स्वस्तात तंबूत परतला. शिवम दुबे याला भोपळाही फोडता आला नाही. भारताला सहावा धक्का

हार्दिक पांड्या बाद..

हार्दिक पांड्याच्या रुपाने भारताला पाचवा धक्का बसला आहे. हार्दिक पांड्या 13 चेंडूत 23 धावांवर बाद झाला.

भारताला चौथा धक्का

सूर्यकुमार यादवच्या रुपाने भारताला चौथा धक्का बसला. सूर्यकुमार यादव 47 धावांवर बाद झाला. भारत चार बाद 124 धावा

भारताला मोठा धक्का

भारताला तिसरा धक्का बसलाय. रोहित शर्मा 57 धावांवर बाद झालाय. भारत तीन बाद 113 धावा

रोहित शर्माचं शानदार अर्धशतक

रोहित शर्माने षटकार ठोकत अर्धशतक ठोकलेय. रोहित शर्माने 36 चेंडूमध्ये 55 धावांवर खेळत आहे. भारतीय संघ 2 बाद 104 धावा... रोहित शर्माने 2024 टी20 विश्वचषकातील तिसरे अर्धशतक ठोकलेय.

रोहित-सूर्याने डाव सावरला

विराट कोहली आणि ऋषभ पंत यांची विकेट लागोपाठ गेल्यानंतर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी भारताच्या डावाला आकार दिलाय. रोहित शर्मा 49 तर सूर्या 27 धावांवर खेळत आहेत. भारत 12 षटकानंतर दोन बाद 91 धावा

थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होणार

थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होणार आहे. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव मैदानात आहेत. अद्याप षटकांमध्ये कपात करण्यात आलेली नाही. पण रात्री 12.10 नंतर सामन्याला सुरुवात होणार असेल तर षटकांमध्ये कपात केली जाणार आहे. 

टी20 विश्वचषकात रोहितचा नवा पराक्रम

टी20 विश्वचषक 2024 मध्ये रोहित शर्माने 200 धावांचा पल्ला पार केला आहे. यंदाच्या विश्वचषका रोहित शर्मा भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरलाय. 

राहुल द्रविडने विराट कोहलीला धीर दिला

थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होणार 

गयानामध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे. काही वेळातच सामना सुरू होईल. पाऊस येण्यापूर्वी 8 षटकांचा सामना झालाय. भारताची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 65 धावा आहे. रोहित शर्मा 26 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 37 धावांवर खेळत आहे. तर सूर्यकुमार यादव सात चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकारासह 13 धावांवर खेळत आहे.  

पावसामुळे सामन्यात व्यत्याय

8 षटकांचा खेळ झाल्यानंतर गयानामध्ये पावसाने हजेरी लावली, त्यामुळे सामना थांबवण्यात आला. सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. थोड्या वेळात सामना सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रोहित शऱ्मा शानदार लयीत

रोहित शर्मा 18 चेंडूमध्ये 26 धावांवर खेळत आहे. मुंबईकर सूर्यकुमार यादवही मैदानात आहे. भारत 2 बाद 46 धावा

भारताला दुसरा धक्का

ऋषभ पंतच्या रुपाने भारताला दुसरा धक्का बसला आहे. पंत अवघ्या 4 धावांनी बाद झालाय. भारत दोन बाद 40 धावा

भारताला मोठा धक्का

भारताला पहिला मोठा धक्का बसलाय. विराट कोहली 9 धावा काढून बाद झालाय.  भारत एक बाद 19 धावा

सामन्याला सुरुवात

रोहित शर्मा आणि विराट कोहली फलंदाजीसाठी मैदानात उतरले आहेत. इंग्लंडकडून रीस टॉप्ली पहिल षटक घेऊन आला

इंग्लडच्या ताफ्यात कोण कोण ?

फिलिप साल्ट, जोस बटलर (कर्णधार), मोइन अली,  जॉनी बेयरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करन, लियाम लिविंगस्टोन, आदिल रशीद, रीस टॉपले, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर

भारताच्या ताफ्यात कोण कोण ? 

 


रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत,  शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह

भारताची प्रथम फलंदाजी

IND vs ENG Semi Final LIVE Score : दोन तासांच्या पावसाच्या व्यत्ययानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्याची नाणेफेक झाली. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. नॉकाऊट सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. 

थोड्याच वेळात नाणेफेक होणार

भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य सामन्याची नाणेफेक थोड्याच वेळात होणार आहे. 8.50 मिनिटांनी नाणेफेक होणार आहे.

8.45 वाजता पंच पुन्हा एकदा पाहणी करणार

गयानामध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे.  सूर्यदेवानं दर्शन दिलेय, त्यामुळे हवामान पूर्णपणे स्वच्छ आहे. खेळाडू मैदानात वॉर्मअप करत आहेत.   ताज्या अपडेटनुसार, पंच भारतीय वेळेनुसार रात्री 8:45 वाजता मैदानाची तपासणी करतील. या सामन्याबाबत पंचांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.





8.30 वाजता पंच मैदानाची पाहणी करणार

IND vs ENG Live Updates: खराब आउटफील्डमुळे नाणेफेकीला उशीर 

गयानामध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे. खेळाडू मैदानात वॉर्मअप करत आहे. पण  खराब आउटफील्डमुळे नाणेफेकीला उशीर होणार आहे.  

पुन्हा पावसाची हजेरी

गयानामध्ये पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नाणेफेकीला उशीर होणार आहे. 





India Vs England : नाणेफेकीला उशीर होणार

पावसामुळे मैदान अतिप्रमाण ओलं झालेय. मैदानातील कर्मचाऱ्यांकडून पाण्याचा निचरा करण्याचं काम सुरु आहे.  खेळपट्टी खराब असल्यामुळे नाणेफेक उशिरा होणार आहे. 





IND vs ENG Semi Final LIVE Score: कोहली आज मोठी खेळी करणार का?

IND vs ENG Semi Final LIVE Score: टी20 विश्वचषकात विराट कोहलीची बॅट अद्याप तळपलेली नाही. सहा सामन्यात विराट कोहलीला फक्त 66 धावाच करता आल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 37 इतकी आहे. विराट कोहलीला दोन वेळा भोपळाही फोडता आला नाही.

पावसाची विश्रांती

गयानामध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे. थोड्याच वेळात नाणेफेक होण्याची शक्यता आहे.





गयानामध्ये पुन्हा एकदा पावसाची हजेरी

गयानामध्ये पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे सामना उशीरा होण्याची शक्यता आहे.





थोड्याच वेळात होणार नाणेफेक

भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यासाठी थोड्याच वेळात नाणेफेक होणार आहे.

India and England Squads

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, यशस्वी जायसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज


इंग्लंड: जोस बटलर (कर्णधार), मोइन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टो, हॅरी ब्रुक, सॅम करन, बेन डकेट, टॉम हार्टले, विल जॅक्स, क्रिस जॉर्डन, लियाम लिविंगस्टोन, आदिल रशीद, फिलिप साल्ट, रीस टॉपले, मार्क वूड

संभाव्य प्लेईंग 11 - 

इंग्लंड : फिलिप साल्ट, जोस बटलर (कर्णधार), मोइन अली,  जॉनी बेयरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करन, लियाम लिविंगस्टोन, आदिल रशीद, रीस टॉपले, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर

संभाव्य प्लेईंग 11 - 

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत,  शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह

भारत-इंग्लंड सामन्यासाठीची खेळपट्टी तयार

पावसानंतर भारत-इंग्लंड सामन्यासाठीची खेळपट्टी तयार...





IND vs ENG Semi Final LIVE Score: हेड टू हेड

India vs England Head To Head भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये टी20 मध्ये काटें की टक्कर पाहायला मिळाली. दोन्ही संघामध्ये आतापर्यंत 23 टी20 सामने झाले आहेत. भारताने 12 सामन्यात बाजी मारली आहे, तर इंग्लंडने 11 सामने जिंकले आहेत. विश्वचषकात न्यूट्रल ठिकाणी भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये आतापर्यंत तीन सामने झाले आहेत. यामध्ये भारताने दोन तर इंग्लंडने एका सामन्यात विजय मिळवलाय. 

विराट कोहली भारताला सामना जिंकून देईल - नवज्योतसिंह सिद्धू

विराट कोहलीचा हा थोडा वाईट काळ आहे. पण विराट कोहली लवकरच फॉर्ममध्ये येईल. विराट कोहली भारताला मोठा विजय मिळवून देईल. विराट कोहलीकडून सर्वांनाच मोठ्या अपेक्षा आहेत. तो एकदा सेट झाल्यावर शानदार फलंदाजी करेल - नवज्योतसिंह सिद्धू

India vs England Pitch Report : गयानामध्ये पावसाची विश्रांती, मैदानावरील कव्हर्स काढले

IND vs ENG Semi Final LIVE Score: भारत विरुद्ध इंग्लंड पिच रिपोर्ट

ndia vs England Pitch Report : प्रोव्हिडेंस स्टेडियम, गयानामधील खेळपट्टी (Providence Stadium Pitch Report) गोलंदाजांसाठी पोषक मानली जाते. फिरकी आणि वेगवान गोलंदाजांना या मैदानावर चांगली मदत मिळते.  पहिल्या चेंडूपासून मोठे फटके मारणं तितके सोपं नसेल. कारण, विस्फोटक फलंदाजी करताना विकेट जाण्याची शक्यता आहे. गोलंदाजांना या खेळपट्टीवर जास्त मदत मिळत आहे. फिरकी गोलंदाजांना खासकरुन जास्त मदत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मधल्या षटकात कोणता संघ जास्त धावा काढतो, त्यावर सामन्याचा निकाल लागू शकतो. टी20 विश्वचषक 2024 मध्ये या मैदानावर आतापर्यंत पाच सामन झालेत. त्यामध्ये प्रथम फलंदाजी कऱणाऱ्या संघाला तीन वेळा विजय मिळलाय. त्यामुळे नाणेफेक महत्वाची ठरणार आहे. या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना सरासरी धावसंख्या 127 इतकी होती, तर दुसऱ्या डावात फलंदाजी करणार्या संघाची सरासरी धावसंख्या 95 इतकी आहे. 

भारत-इंग्लंड सामन्यावर पावसाचे सावट - (Guyana Weather Forecast On 27th June) 

भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये होणाऱ्या नॉकआऊट सामन्यावर पावसाचे सावट आहे. मागील काही दिवसांपासून गयानामध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. बुधवारीही गयानामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. गुरूवारीही गयानामध्ये मुसळधार पावसाची शक्यता स्थानिक हवामान विभागाने वर्तवली आहे. पावसामुळे सामना रद्द झाला तर भारतीय संघ फायनलमध्ये धडक मारणार आहे. दुसऱ्या उपांत्य सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही, पण अतिरिक्त वेळ ठेवण्यात आली आहे. उपांत्य सामना कमीतकमी 10 षटकांचा व्हायला हवा, असा नियम आहे. जर उपांत्य सामना पावसामुळे रद्द झाला तर टीम इंडिया थेट फायनलमध्ये जाणार आहे.

पार्श्वभूमी

IND vs ENG T20 World Cup 2024 Semi Final LIVE Score: टी20 विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं अफगाणिस्तानचा दारुण पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. आता दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंड आणि भारतीय संघ फायनलच्या तिकिटासाठी भिडणार आहेत. दक्षिण आफ्रिकासोबत शनिवारी फायनल कोण खेळणार? याचं उत्तर आज मिळणार आहे. त्यासाठी भारत आणि इंग्लंडचे संघ भिडणार आहेत.


गयानामध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये दुसरा उपांत्य सामना होणार आहे. या सामन्यात भारताला 2022 सालच्या टी20  विश्वचषकात इंग्लंडकडून झालेल्या पराभवाची परतफेड करण्याची संधी मिळेल. 2022 सालच्या टी20  विश्वचषकातही भारत आणि इंग्लंड संघ उपांत्य फेरीत आमनेसामने आले होते. अॅडलेडमधल्या त्या सामन्यात इंग्लंडनं भारताचा 10 विकेट्सनी धुव्वा उडवला होता. रोहित शर्माच्या भारतीय संघानं त्या पराभवाची परतफेड करून यंदाच्या टी20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारावी अशी अपेक्षा भारतीय क्रिकेटरसिक करत आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.