एक्स्प्लोर

अखेरच्या कसोटीतून केएल राहुल, वॉशिंगटन सुंदर संघाबाहेर, जसप्रीत बुमराहबद्दलही महत्वाचं अपडेट

India vs England 5th Test – Dharamsala : इंग्लंडविरोधात होणाऱ्या अखेरच्या कसोटी सामन्याआधी बीसीसीआयकडून (BCCI) महत्वाची महिती दिली आहे.

India vs England 5th Test – Dharamsala : इंग्लंडविरोधात होणाऱ्या अखेरच्या कसोटी सामन्याआधी बीसीसीआयकडून (BCCI) महत्वाची महिती दिली आहे. केएल राहुल (KL Rahul) अखेरच्या कसोटी सामन्याला मुकणार आहे. तर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याचं कमबॅक झालेय. त्याशिवाय वॉशिंगटन सुंदर यालाही रिलिज कऱण्यात आले आहे. बीसीसीआयनं अधिकृत परिपत्रक काढत याबाबतची माहिती दिली. बीसीसीआयकडून मोहम्मद शामी याच्या सर्जरीबद्दलही माहिती देण्यात आली आहे. 

केएल राहुल अखेरच्या सामन्यातून बाहेर - 

अनुभवी फलंदाज केएल राहुल दुखापतीमुळे अखेरच्या सामन्याला मुकणार आहे. हैदराबाद कसोटी सामन्यात त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत त्याला आराम देण्यात आला. दुखापतीमधून सावरल्यानंतर त्याला 15 जणांच्या चमूमध्ये त्याला स्थान देण्यात आले, पण फिटनेस सिद्ध करु न शकल्यामुळे त्याला बाहेर खेळवण्यात आले नाही. तो पाचव्या सामन्यात कमबॅक करेल, असा अंदाज होता. पण त्याच्या फिटनेसमध्ये कोणताही सुधार झाला नाही. त्यामुळे अखेरच्या कसोटी सामन्यातून त्याला वगळण्यात आलेय. मिळालेल्या माहितीनुसार, केएल राहुल उपचारासाठी लंडनला रवाना झालाय. तो दोन आठवड्यापर्यंत क्रिकेटच्या मैदानावर परतण्याची शक्यता नाही. 

जसप्रीत बुमराहचं कमबॅक -

उपकर्णधार जसप्रीत बुमराह अखेरच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघासोबत जोडला गेला आहे. चौथ्या कसोटी सामन्यात त्याला आराम देण्यात आला होता. आता धर्मशालाच्या मैदानावर तो गोलंदाजी करताना दिसेल. 

वॉशिंगटन सुंदरला रिलिज केले - 

अष्टपैलू वॉशिंगटन सुंदरला भारतीय संघातून रिलिज करण्यात आले आहे. तो रणजी सामने खेळण्यासाठी तामिळनाडू संघासोबत जोडला जाणार आहे. 2 मार्चपासून तामिळनाडू आणि मुंबई यांच्यामध्ये उपांत्यफेरीचा सामना होणार आहे. त्यासाठी तो तामिळनाडू संघासोबत जोडला गेलाय. जर गरज पडली तर वॉशिंगटन सुंदर रणजी सामन्यानंतर भारतीय चमूसोबत जोडला जाईल. 


मोहम्मद शामीबद्दल अपडेट - 

26 फेब्रुवारी रोजी मोहम्मद शामी याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. डाव्या पायाला दुखापत झाली होती. मोहम्मद शामीच्या प्रकृतीमध्ये झपाट्यानं सुधारणा होत आहे. तो लवकरच एनसीएमध्ये दाखल होईल.

India’s updated squad for the 5th Test : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार),यशस्वी जायस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल, केएस भरत, देवदत्त पड्डीकल, आर. अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाशदीप

Rohit Sharma (C), Jasprit Bumrah (VC), Yashasvi Jaiswal, Shubman Gill, Rajat Patidar, Sarfaraz Khan, Dhruv Jurel (WK), KS Bharat (WK), Devdutt Padikkal, R Ashwin, Ravindra Jadeja, Axar Patel, Kuldeep Yadav, Mohd. Siraj, Mukesh Kumar, Akash Deep.

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Abishek Porel Arrested : मोठी बातमी: IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
Team India Squad For ODI World Cup 2027 : रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
IND vs SL 1st Test Playing XI : सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
Ajinkya Rahane : निवृत्ती जाहीर करताच सचिन तेंडुलकरचा पहिला फोन...; क्रिकेटच्या देवाचा काय होता अजिंक्य रहाणेला शेवटचा मेसेज, केला मोठा खुलासा
निवृत्ती जाहीर करताच सचिन तेंडुलकरचा पहिला फोन...; क्रिकेटच्या देवाचा काय होता अजिंक्य रहाणेला शेवटचा मेसेज, केला मोठा खुलासा

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Embed widget