India vs England Test, LIVE : भारताचा युवा फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) याने भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील बर्मिंगहम येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यात दमदार शतक पूर्ण केलं आहे. पण त्याआधी सामन्यात त्याने ठोकलेल्या पहिल्या-वहिल्या शतकासह एक नवा रेकॉर्ड रचला आहे. त्याने 100 आंतरराष्ट्रीय षटकार पूर्ण करत मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडला आहे. पंत सर्वात कमी वयात 100 आंतरराष्ट्रीय षटकार पूर्ण करणारा भारतीय बनला आहे.
पंत 24 वर्षे 271 दिवसांचा असतानाच 100 आंतरराष्ट्रीय षटकार पूर्ण केले आहेत. याआधी 25 वर्षाचा असताना सचिनने हा रेकॉर्ड केला होता. पण आता हा रेकॉर्ड पंतच्या नावे झाला आहे. या यादीत तिसऱ्या स्थानावर सुरेश रैना असून त्याने 25 वर्षे 77 दिवसांचा असताना 100 आंतरराष्ट्रीय षटकार पूर्ण केले होते. याशिवाय 100 आंतरराष्ट्रीय षटकार पूर्ण करण्यासाठी पंतने 116 सामने खेळत दुसरा क्रमांक गाठला आहे. याआधी हार्दिकने 101 आंतरराष्ट्रीय सामन्यात 100 षटकार पूर्ण केले आहेत. यादीत तिसऱ्या स्थानावर केएल राहुल असून त्याने 129 सामन्यांत 100 षटकार पूर्ण केले आहेत.
सर्वात कमी सामन्यांत 100 आंतरराष्ट्रीय षटकार पूर्ण कऱणारे भारतीय
- 101 - हार्दिक पांड्या
- 116 - ऋषभ पंत
- 129 - केएल राहुल
- 132 -एम एस धोनी
- 166 - सुरेश रैना
- 166 - रोहित शर्मा
पंत-जाडेजा जोडीने सांभाळला डाव
सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण दोन्ही सलामीवीर गिल, पुजारा स्वस्तात बाद झाले. मग कोहली, विहारी आणि श्रेयस अय्यर यांनीही लगेचच तंबूचा रस्ता धरला. पण त्यानंतर मैदानावर आलेल्या पंत, जाडेजा जोडीने मात्र एका संयमी खेळीने भारताचा डाव सावरला. यावेळी पंतने आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये तुफान फटकेबाजी सुरु ठेवली. 89 चेंडूत त्याने 15 चौकार आणि एका षटकरासह 100 धावा पूर्ण केल्या. दुसरीकडे जाडेजानेही त्याला चांगली साथ देत अर्धशतक पूर्ण केलं असून जाडेजाने 50 धावा करण्यासाठी 109 चेंडू घेतले.
हे देखील वाचा-
- Virat Kohli : पुन्हा कोहली फॅन्सच्या पदरी निराशा! स्वस्तात विराट बाद; सोशल मीडियावर विविध मीम्स व्हायरल
- Anderson to Pujara : अँडरसन पुजाराची पाठ सोडेना, मालिकेतील पाचही सामन्यांच्या पहिल्या डावात धाडलं तंबूत
- IND vs ENG 5th Test : अँडरसन-ब्रॉड जोडी भारतीय फलंदाजाविरुद्ध मैदानात उतरणार, इंग्लंडने नाणेफेक जिंकत निवडली गोलंदाजी