India vs England Test, LIVE : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात बर्मिंगहम येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यात पुन्हा एकदा संघाच्या मदतीला ऋषभ पंत (Rishabh Pant) धावून आला आहे. एकीकडे आघाडीचे सर्व फलंदाज तंबूत परतत असताना पंतने जाडेजासोबत भारताचा डाव सांभाळला. सोबतच आपलं शतकही पूर्ण करत पुन्हा एकदा कसोटी सामन्यात टी20 प्रमाणे फलंदाजी केली. 89 चेंडूत पंतने शतक पूर्ण केलं असून जाडेजानेही त्याला चांगली साथ दिली.



सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण दोन्ही सलामीवीर गिल, पुजारा स्वस्तात बाद झाले. मग कोहली, विहारी आणि श्रेयस अय्यर यांनीही लगेचच तंबूचा रस्ता धरला. पण त्यानंतर मैदानावर आलेल्या पंत, जाडेजा जोडीने मात्र एका संयमी खेळीने भारताचा डाव सावरला. यावेळी पंतने आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये तुफान फटकेबाजी सुरु ठेवली. 89 चेंडूत त्याने 15 चौकार आणि एका षटकरासह 100 धावा पूर्ण केल्या. दुसरीकडे जाडेजानेही त्याला चांगली साथ देत अर्धशतक पूर्ण केलं असून जाडेजाने 50 धावा करण्यासाठी 109 चेंडू घेतले.  


बर्मिंगमहमध्ये विजय अवघड 


भारताने 1967 साली सर्वात आधी इंग्लंडविरुद्ध या मैदानात सामना खेळला होता. त्यावेळी भारताचा पराभव झाला. पुढील दरवर्षी जेव्हा-जेव्हा भारत या मैदानात इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरला त्या-त्या वेळी भारताला पराभव पत्करावा लागला. केवळ 1986 साली सामना अनिर्णीत सुटला होता. त्यानंतरही भारताची पराभवाची मालिका कायम राहिली. भारताने एकूण 7 सामने या मैदानात खेळले असून 6 गमावले असून एक अनिर्णीत सुटला आहे.


हे देखील वाचा-