Ind vs Eng 5th Test: भारताने इंग्लंडविरुद्धचा (India vs England 5th Test) पाचवा कसोटी सामना 6 धावांनी जिंकला. कसोटीच्या शेवटच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी 35 धावांची आवश्यकता होती, तर भारताला 4 विकेट्सची गरज होती. यावेळी भारतीय संघाचे वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंड धुव्वा उडवला. तसेच पाच सामन्यांची ही कसोटी मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडविली.
भारत आणि इंग्लंडच्या मालिकेआधी अनेक दिग्गजांकडून ही मालिका कोण जिंकेल?, भारत आणि इंग्लंडची मालिका कशी राहिल?, याबाबत अंदाज वर्तवण्यात आला होता. या अंदाजात आता भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि समालोचक दिनेश कार्तिकचाच अंदाज खरा ठरला आहे. तर इंग्लंडचा माजी कर्णधार अलेस्टर कूक, दक्षिण अफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेन, इंग्लंडचा फलंदाज जॉस बटलर, ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू माइकल क्लार्क, टीम इंडिया माजी खेळाडू आकाश चोप्रा यांचा अंदाज चुकला.
शुभमन गिल अन् हॅरी ब्रुक मालिकावीरचे विजेते-
पहिल्या डावात भारताने 224 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, इंग्लंडचा पहिला डाव 247 धावांवर संपला आणि इंग्लिश संघाने 23 धावांची आघाडी घेतली. भारताने दुसऱ्या डावात 396 धावा केल्या आणि एकूण 373 धावांची आघाडी घेतली आणि 374 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरादाखल, इंग्लंडचा दुसरा डाव 367 धावांवर संपला. जो रूटच्या 105 धावा आणि हॅरी ब्रूकच्या 111 धावा इंग्लंडला पराभवापासून वाचवू शकल्या नाहीत. सिराजने शेवटच्या विकेट म्हणून यॉर्करने अॅटकिन्सनला त्रिफळाचीत केले. यासह, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 5 कसोटी सामन्यांची मालिका 2-2 अशी बरोबरीत संपवली. पाचव्या कसोटीसाठी मोहम्मद सिराजला सामनावीर म्हणून पुरस्कार देण्यात आला. तर मालिकावीर म्हणून शुभमन गिल आणि हॅरी ब्रुकला निवडण्यात आले.