एक्स्प्लोर

Ind Vs Eng 4th Test: सामना संपल्यानंतरही बेन स्टोक्स भांडत राहिला; जडेजा अन् सुंदरसोबत काय केलं?, मैदानात ड्रामा, VIDEO

Ind Vs Eng 4th Test: सामन्यातील पाचवा दिवसाचा खेळ संपण्यासाठी 20-25 मिनिटं बाकी असताना इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स टीम इंडियासमोर मॅच लवकर ड्रॉ करण्यासाठी गयावया करु लागला होता.

Ind Vs Eng 4th Test: भारतीय संघातील शुभमन गिल, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदरच्या शतकांच्या जोरावर भारतानं इंग्लंडविरुद्धची (Ind Vs Eng 4th Test) चौथी कसोटी वाचवली. भारतीय संघाने आपली क्षमता आणि गुणवत्ता दाखवून देताना जवळपास गमावलेला चौथा कसोटी सामना अनिर्णित राखत यजमान इंग्लंडचा विजय अक्षरशः हिसकावून घेतला. भारताच्या या झुंजार फलंदाजीचं कौतुक करण्यात येत आहे.  दरम्यान, सामन्यातील पाचवा दिवसाचा खेळ संपण्यासाठी 20-25 मिनिटं बाकी असताना इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स टीम इंडियासमोर मॅच लवकर ड्रॉ करण्यासाठी गयावया करु लागला. मात्र भारताने ही ऑफर धुडकावून लावली.

स्टोक्सने मॅच ड्रॉ करण्याची ऑफर दिली तेव्हा जडेजा आणि सुंदर शतकाच्या उंबरठ्यावर होते. जडेजा 89 तर सुंदर 80 धावांवर खेळत होते.  स्टोक्सने मॅच ड्रॉ करण्याची ऑफर दिल्यानंतर कर्णधार शुभमन गिल आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी ड्रेसिंग रुममधून स्पष्टपणे नकार दिला. दोघांनीही सामना ड्रॉपर्यंत पोहचवण्यासाठी चांगली फलंदाजी केली. त्यामुळे दोघांनीही शतक करावे, अशी गिल आणि गंभीरची भावना होती. त्यामुळे गिल आणि गंभीरने जडेजा आणि सुंदरला फलंदाजी सुरु ठेवण्यास सांगितले. 

जडेजा अन् सुंदरने ऑफर नाकारताच स्टोक्स संतापला-

सामना ड्रॉ करण्याची बेन स्टोक्सची ऑफर जडेजा अन् सुंदरने नाकारल्यानंतर बेन स्टोक्ससह इंग्लंडचे अनेक खेळाडू संतापल्याचे दिसून आले. यावेळी मैदानात चांगलाच ड्रामा झाल्याचं पाहायला मिळालं. सामना संपल्यानंतरही बेन स्टोक्सने जडेजा आणि सुंदरसोबत हात मिळवला नाही. सामना संपल्यानंतरही बेन स्टोक्स याच मुद्द्यावरुन भांडत राहिल्याचं समोर आलं.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Lalit Kaushik 1️⃣8️⃣ (@crickmemesbylalit)

सामना कसा राहिला?

मँचेस्टर कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं. भारताचा पहिला डाव 358 धावांत आटोपला. टीम इंडियाकडून साई सुदर्शनने 61, यशस्वी जैस्वालने 58, ऋषभ पंतने 54, के.एल. राहुलने 46, शार्दुल ठाकूरने 41 आणि वॉशिंग्टन सुंदरने 27 धावा केल्या. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने भेदक मारा करत 5 बळी घेतले. उत्तरादाखल इंग्लंडने पहिल्या डावात भक्कम 669 धावा फटकावल्या आणि भारतावर 311 धावांची मोठी आघाडी घेतली. जो रूटने 150 आणि कर्णधार बेन स्टोक्सने 141 धावांची शानदार शतकी खेळी केली. दुसऱ्या डावात भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन दोघेही शून्यावर बाद झाले. मात्र नंतर शुभमन गिल आणि के.एल. राहुलने जबरदस्त झुंज दिली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 188 धावांची भागीदारी करत इंग्लंडला अडचणीत टाकलं. राहुलने 230 चेंडूत 90 धावा केल्या, तर गिलने शतकी खेळी करत 103 धावा फटकावल्या. यानंतर रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरने संयमी आणि शिस्तबद्ध फलंदाजी करत भारताला पराभवापासून वाचवलं. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 200 हून अधिक धावांची अभेद्य भागीदारी केली. जडेजा 107 आणि सुंदर 101 धावा करून नाबाद राहिले. अखेर या दोघांच्या खेळीमुळे सामना ड्रॉ राहिला.

संबंधित बातमी:

Ind vs Eng 4th Test: तिसऱ्याचं दिवशी इंग्लंडचा विजय निश्चित झालेला; भारताने पराभव कसा टाळला? पाहा 5 मोठी कारणं!

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Eng vs Pak 1st Test : कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
Ind vs Sl 1st Test : पडिक्कलच्या 211 धावा की मानव सुतारच्या 10 विकेट्स...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार गिलने थेट नाव सांगू टाकलं
पडिक्कलच्या 211 धावा की मानव सुतारच्या 10 विकेट्स...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या विजयाचा खरा हिरो कोण? कर्णधार गिलने थेट नाव सांगू टाकलं

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis and Rahul Gandhi: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला फक्त काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Embed widget