India vs England 4th Test : भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) चौथ्या कसोटी सामन्या भारतीय संघ (Team India) 307 धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यात टीम इंडियाचा युवा खेळाडू ध्रुव जुरेलने (Dhruv Jurel) धमाकेदार खेळी केली. युवा विकेटकीपर फलंदाज ध्रुव जुरेलने 149 चेंडूमध्ये 90 धावांची खेळी केली, यामध्ये 6 चोकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे.
ध्रुव जुरेलची दमदार खेळी
टीम इंडियाचा युवा यष्टीरक्षक ध्रुव जुरेल याने कारकिर्दीतील अवघ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात (IND vs ENG 4th Test) धमाकेदार खेळी खेळली ज्यामुळे इंग्लंड संघाला चांगलाच घाम फुटला आहे. रांचीमध्ये खेळल्या जात असलेल्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी या युवा फलंदाजाने पहिल्या डावात एकट्याने सामन्याचं चित्रच बदलून टाकलं. ध्रुव जुरेलने 91 धावांची दमदार खेळी करत इंग्लंडच्या मोठ्या आघाडीच्या आशा धुळीस मिळवल्या. भारतीय संघाला पहिला डाव 307 धावांपर्यंत मर्यादित राहिला आणि ध्रुवच्या खेळीमुळे इंग्लंडला केवळ 46 धावांची आघाडी घेता आली.
ध्रुव जुरेलच्या कारकिर्दीतील पहिलं अर्धशतक
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना रोमांचक होत आहे. दुसऱ्या दिवशी भारताने इंग्लंडचा पहिला डाव 353 धावांत गुंडाळला. टीम इंडियाला सुरुवातीचा धक्का बसला आणि लवकरच स्कोअर 7 विकेटवर 171 धावा झाल्या. 161 धावांवर भारताने पावी विकेट गमावली तेव्हा ध्रुव जुरेल मैदानात उतरला होता. त्याने डाव सांभाळत कारकिर्दीतील पहिले अर्धशतकही झळकावलं.
जुरेल आणि कुलदीपची महत्त्वाची भागीदारी
दुसऱ्या दिवशी इंग्लंडला 353 धावांवर ऑलआउट केल्यानंतर टीम इंडिया पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरली. त्यानंतर दिवसअखेर भारताने सात विकेट्सवर 219 धावा केल्या होत्या. यावेळी कुलदीप यादव आणि ध्रुव जुरेल क्रीजवर उपस्थित होते. जुरेल आणि कुलदीपने तिसऱ्या दिवसाची सुरुवात फलंदाजी केली. या दोघांनी आठव्या विकेटसाठी 202 चेंडूत 76 धावांची भागीदारी केली, ज्याचा संघाला खूप फायदा झाला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Akash deep Profile : 6 महिन्यांच्या आत वडील आणि भावाला गमावलं, पहिल्याच कसोटीत इंग्लंडला घाम फोडणाऱ्या आकाश दीपची कहाणी