Akash deep Profile : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील (INDvsENG Test Series) चौथा सामना रांचीच्या मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात वेगवान गोलंदाज आकाश दीप (Akash Deep) याने भारताकडून पदार्पण केले आहे. चौथ्या कसोटी इंग्लडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंडच्या संघाला आकाश दीपने (Akash Deep)  अक्षरश: घाम फोडलाय. त्याने पहिल्या सेशनमध्ये त्याने 10 चेंडूमध्ये 3 विकेट्स पटकावल्या. 


आकाश दीपचं संघर्षमय आयुष्य 


आकाशचे सुरुवातीचे आयुष्य सोपे नव्हते. 2015 मध्ये आकाशच्या वडिल आणि भावाचे 6 महिन्यांच्या निधन झाले होते. त्याच्या वडिलांचे स्ट्रोकमुळे निधन झाले होते. वडीलांच्या निधनानंतर आकाशच्या मोठ्या भावाचाही मृ्त्यू झाला होता. त्यामुळे घरची परिस्थिती अतिशय हालाकीची झाली होती. आर्थिकदृष्ट्याही आकाशवर अडचणींचा भडीमार सुरुच होता. शिवाय, आईचीही जबाबदारी आकाशवरच होती. त्यामुळे आकाश दीप 3 वर्ष क्रिकेटपासून दूर होता. 


सरकारी नोकरी मिळवं, आकाशच्या वडिलांची इच्छा 


आकाश काही दिवसांपूर्वीच बोलताना म्हणाला की, माझे वडिल बिहार पोलीसमध्ये कॉस्टेबल किंवा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याची परिक्षा देण्यास सांगत होते.  दरम्यानच्या काळात आकाशने पुन्हा एकदा क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचे स्वप्न घेऊन दुर्गापूरला परतला. त्यानंतर कोलकातामध्येही गेला. तिथे त्याने छोटी रुम भाड्याने घेतली आणि पुन्हा एकदा क्रिकेटचा प्रवास सुरु केला. 27 वर्षीय आकाश हा मूळचा बिहारचा आहे. 


कठीण काळात मित्राची साथ 


टीम इंडियात निवड झाल्यानंतर आकाश म्हणाला की,"एका मित्राने कठिण काळात भरपूर मदत केली. या मित्राच्या मदतीनेच मी पश्चिम बंगालच्या दुर्गापूर पोहोचलो. तिथे मला एका क्लबमध्ये खेळण्याची संधी मिळाली. तिथे माझी टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून कमाईही होत होती." इथूनच आकाशने भरारी घेतली. त्याने रणजी सामने खेळण्यास सुरुवात केली. फर्स्टक्लास क्रिकेटमध्ये त्याने अनेक वर्षे घाम गाळला. त्यानंतर त्याची भारतीय संघात निवड झाली. 






इतर महत्वाच्या बातम्या 


Shreyas Iyer and Ishan Kishan : 'गायब' ईशान किशन आणि बहाणा सुरु केलेल्या श्रेयस अय्यरला बीसीसीआय एकाचवेळी तगडा हादरा देणार!