INDvsENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना 24 फेब्रुवारीपासून अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दुसर्या कसोटीतील पराभवानंतर इंग्लंडच्या फलंदाजांना हे समजले असावे की फिरकीच्या सहाय्याने भारतीय खेळपट्ट्यांवर धावा करणे इतके सोपे नाही. तर भारतीय संघाला घरगुती मैदानांवरील परिस्थितीचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. खेळपट्टीबाबत पाहुण्या संघास कोणत्याही प्रकारची तयारी करुन द्यायची नाही. यामुळेच इंग्लंडला गोंधळात ठेवण्यासाठी मोटेराच्या स्टेडियममध्ये दोन प्रकारच्या खेळपट्ट्या तयार केल्या आहेत. चेन्नईतील दुसऱ्या कसोटीप्रमाणेच येथेही बॉल फिरेल, खेळपट्टीवर किती गवत असेल, वेगवान गोलंदाजांना उपयुक्त ठरेल की नाही, या काही प्रश्नांची उत्तरे मिळवणे इंग्लंडच्या संघाला कठीण झाले आहे.
सामन्यापूर्वी 48 तासांपूर्वी खेळपट्टी आयसीसीकडे सोपवण्यात येते
आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी वापरली जाणारी खेळपट्टी सामन्याच्या 48 तास आधी आयसीसी मॅच अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली जाते. खेळपट्टीबाबत इंग्लंड संघाचा संशय कायम ठेवावा अशी भारताची इच्छा आहे आणि खेळपट्टी आयसीसीच्या अधिकाऱ्यांकडे देण्यापूर्वी ती कशी आहे हे उघड होऊ नये ही भारतीय संघाची इच्छा आहे. यामुळे इंग्लंडचा कर्णधार जो रुट याला इंग्लंडला प्लेईंग इलेव्हनची निवड करणे अवघड झाल्याचे सिद्ध होत आहे.
दोन्ही खेळपट्ट्यांवर गवत
गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, मोटेरा येथे दोन प्रकारच्या खेळपट्ट्या तयार केल्या आहेत. एक खेळपट्टी काळ्या मातीचा वापर केला आहे. ज्यावर वेग आणि अतिरिक्त बाउन्स दिसेल आणि वेगवान गोलंदाजांना उपयुक्त ठरेल. तर दुसरी खेळपट्टी लाल रंगाची बनलेली आहे. दुसर्या खेळपट्टीवर दुसर्या कसोटी प्रमाणे टर्न आणि बाऊन्स दिसेल. ही खेळपट्टी स्पीनर्सना उपयुक्त ठरेल. दोन्ही खेळपट्ट्यांवर बरंच गवत आहे, यामुळे खेळपट्टी कशी असेल सांगणे कठीण आहे.
इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर
मोटेरा स्टेडियमही नवीन
मोटेराचे स्टेडियम नव्यानेच तयार केले आहे. आतापर्यंत येथे फक्त काही टी -20 सामने खेळले गेले आहेत. गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, टी 20 सामन्यात फक्त 40 षटकांचा खेळ होतो आणि त्यानुसार खेळपट्टी कशी आहे याचा अंदाज लावणे कठीण असते.