INDvsENG : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पुढील महिन्यात इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणार्या पाच सामन्यांच्या टी -20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या मालिकेसाठी प्रथमच सूर्यकुमार यादव, ईशान किशन आणि राहुल तेवतिया यांना संघात संधी मिळाली. तसेच मिस्ट्री स्पीनर वरुण चक्रवर्तीही संघात परतला आहे. आयपीएल 2020 आणि डोमेस्टिक क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीमुळे या सर्वांनी ही संधी मिळाली आहे.
सूर्यकुमार यादवला भारतीय संघात संधी देण्याबाबत माजी क्रिकेटपटू आणि चाहते बोलत होते. आयपीएल 2020 मध्ये शानदार कामगिरी करूनसुद्धा सूर्यकुमार यादवला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियामध्ये स्थान मिळालं नाही. तेव्हा चाहत्यांनी आणि माजी क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त केली होती. पण आता सूर्यकुमार यादवला इंग्लंडविरुद्धच्या टी -20 मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आलं आहे. यावर त्याचे फॅन्स खूप आनंदित आहेत. तसेच, हरभजन सिंग आणि इरफान पठाण यांनीही सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांच्या टीम इंडियामधील निवडीबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
हरभजन सिंगने ट्वीट केले की, "अखेल सूर्यकुमार यादवला टीम इंडियामध्ये स्थान मिळालं. खुप शुभेच्छा"
इरफान पठाण याने ट्वीट केले की, अखेर प्रतीक्षा संपली सूर्यकुमार यादव. अभिनंदन मित्र. खुप शुभेच्छा. ईशान किशन आणि राहुल तेवतिया यांना पदार्पणासाठी शुभेच्छा.
इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर
ऋषभ पंतला भारतीय संघात पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. बीसीसीआयनं नुकतंच इंग्लंडच्या संघासोबतच्या आगामी टी20 मालिकेसाठी संघ जाहीर केला. संघात नेमका कोणकोणत्या खेळाडूंचा समावेश असेल याचा उलगडा बीसीसायकडून ट्विटरच्या माध्यमातून करण्यात आला आहे. IPL मध्ये मुंबईच्या संघातून दमदार कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमार यादव, ईशान किशन या खेळाडूंनाही संघात स्थान देण्य़ात आलं आहे. आयपीएल 2020 आणि स्थानिक क्रिकेटमधील प्रशंसनीय कामगिरीसाठी या खेळाडूंना ही संधी देण्यात आली आहे.
मोठा खुलासा! यशशिखरावर असणारा विराट एकटा पडतो तेव्हा....
भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, ईशान किशन, युजवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, नवदीप, शार्दुल ठाकूर.