(Source: Poll of Polls)
IND vs ENG 3rd Test Day 3 Live : तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला 2 धावांची आघाडी; टीम इंडिया 387 धावांवर ऑलआउट, केएल राहुलचं शतक
England vs India 3rd Test Lord's Update : लॉर्ड्स येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे.
LIVE

Background
India vs England, 3rd Test, Day 3, Live Score : लॉर्ड्स येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. दुसऱ्या दिवशी इंग्लंडला 387 धावांवर रोखल्यानंतर, टीम इंडियाने आपला पहिला डाव सुरू केला आणि केएल राहुलने दमदार अर्धशतक झळकावून संघाची धावसंख्या 145 धावांवर नेली. राहुल 53 धावा काढून नाबाद परतला, तर दुखापती असूनही फलंदाजीसाठी उतरलेला ऋषभ पंतही 19 धावा काढून नाबाद परतला. पण, टीम इंडियाने 3 विकेट गमावल्या आहेत.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला 2 धावांची आघाडी; टीम इंडिया 387 धावांवर ऑलआउट
भारत आणि इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्स कसोटीचा तिसरा दिवस संपला आहे. पहिल्या डावात भारताचा डाव 387 धावांवर संपला होता, तर दुसऱ्या डावात इंग्लंडने दिवसाचा खेळ संपेपर्यंत न गमावता दोन धावा केल्या होत्या. खेळ थांबला तेव्हा जॅक क्रॉली 2 आणि बेन डकेट खाते न उघडता क्रीजवर होते.
भारताची आघाडी घेण्याची सुवर्णसंधी हूकली; दोन्ही संघांच्या पहिल्या डावात एकसमान धावा; राहुलचं शतक
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या डावात भारतीय संघ आघाडी घेण्यास अपयशी ठरला आहे. इंग्लंडने पहिल्या डावात 387 धावा केल्या आणि भारतालाही तेवढ्याच धावा करता आल्या, त्यामुळे पहिल्या डावात दोन्ही संघांची धावसंख्या समान होती. भारताकडून केएल राहुलने शतक झळकावले, तर ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांनी अर्धशतके झळकावली. तरीही, भारतीय संघ आघाडी घेण्यात यशस्वी झाला नाही. भारताने शेवटचे 4 विकेट 11 धावांच्या अंतराने गमावले, ज्यामुळे आघाडी मिळवण्यात त्यांना यश आले नाही.















