एक्स्प्लोर

Sanju Samson : संजू सॅमसनला संघातून वगळणं सर्वात मोठी चूक, अभिषेक- वैभव सलामीची जोडी होऊ शकत नाही, मोहम्मद कैफ संतापला 

IND vs ENG T20 Series: भारताचा इंग्लंड विरोधातील दुसऱ्या टी 20 सामन्यात पराभव झाल्यानंतर आता उद्या तिसरा टी 20 सामना होणार आहे.

नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफ संजू सॅमनसला टी 20 संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्याच्या निर्णयावर संतापला आहे. संजू सॅमसनला वगळणं टीम इंडियाची मोठी चूक असल्याचं कैफ म्हणाला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात टीम इंडियानं तिसरा सामना गमावला. यानंतर कर्णधार, प्रशिक्षक यांच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संजू सॅमसनला दुसऱ्या टी 20 मॅचमध्ये वगळून वैभव सूर्यवंशीला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली. मोहम्मद कैफ यानं अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी दीर्घकालीन विचार केला असता भारताचे सलामीवर असू शकत नाही, असंही म्हटलं.

Team India : टीम इंडियाकडून पुन्हा चूक 

एबीपी न्यूजचे प्रतिनिधी रवीश बिष्ट यांच्यासोबत बोलताना मोहम्मद कैफ म्हणाला की, भारतीय क्रिकेट टीम तिच चूक करत आहे जी वर्ल्ड कपमध्ये केली होती. वर्ल्ड कपमध्ये ईशान किशन आणि अभिषेक शर्माद्वारे डावाची सुरुवात करण्यात आली होती. विरोधातील संघानं फिरकीपटू आणले आणि अभिषेक शर्मा तीन वेळा शुन्यावर बाद झाला. ईशान किशन देखील बाद झाला. वर्ल्ड कप दरम्यान आम्ही सांगत होतो दोन डावखुरे फलंदाज पुरेसे नाहीत. तुम्हाला एका राइट हँड फलंदाजाची गरज आहे. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव झाला नाही तोपर्यंत संजूला संधी मिळाली नव्हती, असंही कैफनं म्हटलं.  

आयर्लंड विरोधातील मालिकेत पराभव झाल्यानंतर झालेल्या बदलांबाबत देखील कैफनं भाष्य केलं. आपण जेव्हा आयर्लंड विरोधात पराभूत झालो तेव्हा वॉशिंग्टन सुंदर आणि प्रसिद्ध कृष्णाला हटवण्यात आलं.  असाच प्रकार टी 20 वर्ल्ड कपमध्ये झाला होता. मला म्हणायचंय की जेव्हा टीमचं व्हिजन दीर्घकाळीन असतं तेव्हा टीम दीर्घकाळ वाट पाहत नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोपर्यंत पराभव झाला नाही तोपर्यंत संजू सॅमसनला संधी मिळाली नाही. झिम्बाब्वेचा गोलंदाज सिंकदर रजा संजू सॅमसन असल्यानं गोलंदाजी करण्यास आला नव्हता. एक लेफ्ट हँड फलंदाज आणि एक राइट हँड फलंदाज कॉम्बिनेशन वर्ल्ड कपमध्ये महत्त्वाचं ठरलं. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांच्यामुळं भागीदारी होण्यास मदत झाली, असंही कैफनं म्हटलं. 

कुलदीप यादवला वगळणे चूक 

मोहम्मद कैफ म्हणाला की वारंवार चूक केली जात आहे. अभिषेक शर्मा- वैभव सूर्यवंशी लाँग टर्मसाठी टीम इंडियाचे सलामीवीर होऊ शकत नाहीत. याशिवाय कुलदीप यादवला वगळणं देखील चुकीचं असल्यानं कैफनं म्हटलं. रवि बिश्नोई कुलदीप यादवच्या जवळपास देखील नाही. कुलदीप यादवनं टी 20 मध्ये 95 विकेट घेतल्या असून इकोनॉमी 7 पेक्षा कमी आहे. कुलदीप यादवच्या जवळपास कोणी नाही. एक आयपीएल खराब गेल्यानं त्याला संघातून वगळलं जाऊ नये, असंही कैफ म्हणाला.  
 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL 1st Test DAY-3 Live : आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
Ind vs Sl 1st Test Day-3 Weather Forecast Galle : भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
Pat Cummins : बेस्ट टीम मैदानात उतरवल्यानंतरही घरच्या मैदानावर बांगलादेशकडून पराभव, पॅट कमिन्सनं पराभवाचं खापर कोणावर फोडलं?  
बांगलादेशनं 23 वर्षात जे जमलं नाही ते करुन दाखवलं, पॅट कमिन्सनं पराभवाचं खापर कोणावर फोडलं?
Aus vs Ban 1st Test : बांगलादेशनं ऑस्ट्रेलियाची घरच्या मैदानावर लाज काढली, दिग्गज पाँटिंग-हेडन संतापले; टीमला नको नको ते बोलले
बांगलादेशनं ऑस्ट्रेलियाची घरच्या मैदानावर लाज काढली, दिग्गज पाँटिंग-हेडन संतापले; टीमला नको नको ते बोलले
Advertisement

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Bollywood Actor Prem Adib Life Stroy: ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', लोक देवघरात फोटो लावून पुजायचे, ओळखलं का कोण?
ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', ओळखलं का कोण?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
Bhavesh Kaware and Amit Thackeray: भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Embed widget