BCCI on Oval Win:  टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात 157 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. तब्बल 50 वर्षांनी ओव्हलवर टीम इंडियाने विजय साजरा केला. या विजयासह भारताने इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली. या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील वातावरणही तितकच आनंदी होतं. हा विजय किती महत्त्वाचा आणि अविस्मरणीय होता हे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत होतं 


बीसीसीआयने या विजयानंतरचा एक व्हिडीयो ट्विटरवर शेअर केला आहे. यात सर्व खेळाडू एकमेकांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. आतापर्यंत  हजारो क्रिकेट चाहत्यांना हा व्हिडीओ पाहिला आहे. कर्णधार विराट कोहलीसह अनेक खेळाडू या व्हिडीओत जल्लोष करताना दिसत आहेत. बीसीसीआयने या व्हिडीओला कॅप्शन दिलं की, ड्रेसिंग रुममधील काही अनसीन दृष्य आणि प्रतिक्रिया आम्ही तुम्हाला दाखवत आहोत, जे ओव्हल कसोटीतील विजयानंतर आल्या आहेत.  


INDvsENG 4th Test : जसप्रीत बुमराह बनला सर्वात जलद 100 विकेट घेणारा भारतीय गोलंदाज, 'या' दिग्गजांना टाकलं मागे






50 वर्षांनी ओव्हलवर विजय


टीम इंडियाने 50 वर्षे, 13 दिवसांनी कसोटीत ओव्हलमध्ये ऐतिहासिक विजय साजरा केला. याआधी टीम इंडियाने 24 ऑगस्ट 1971 मध्ये  इंग्लंडला ओव्हलवर पराभूत केले होते. या सामन्यात भारताने 4 विकेटने विजय साजरा केला होता. आता भारताने पुन्हा एकदा इंग्लंडला ओव्हलमध्ये 157 धावांनी पराभूत केलं.


IndiaVsEngland 4th Test : भारताचा इंग्लंडविरुद्ध 157 धावांनी दणदणीत विजय, मालिकेत भारताची 2-1 ने आघाडी


इंग्लंडमध्ये 3 विजय साजरे करणारा विराट आशियातील एकमेव कर्णधार


विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने मोठं यश संपादित केलं आहे. विराट कोहली हा आशियाचा एकमेव कर्णधार आहे ज्याने इंग्लंडला 3 कसोटी सामन्यात पराभूत केले आहे. तीन पैकी दोन विजय एकाच मालिकेत मिळवले आहेत. तर 2018 मध्ये शेवटच्या दौऱ्यात एक सामना विराटच्या नेतृत्वात भारताने जिंकला होता. एवढंच नाही तर विराट कोहली हा आशियाचा एक कर्णधार आहे ज्याने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये एकापेक्षा जास्त कसोटी सामने जिंकले आहेत.