INDvsENG 4th Test : जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) ओव्हल कसोटीत पाचव्या दिवशी कसोटी क्रिकेटमध्ये 100 विकेट्सचा टप्पा गाठला. जसप्रीत बुमराह 100 विकेट्स सर्वात कमी सामन्यात ही कामगिरी केली आहे. बुमराहने ओव्हल कसोटीत पहिल्या डावात दोन बळी घेतले, तर दुसऱ्या डावात ओली पोपला आऊट कर 100 कसोटी विकेट्स पल्ला गाठला. यासह बुमराहने भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांचा विक्रमही मोडला. कपिल देव यांनी 25 कसोटी 100 विकेट्स घेतल्या होत्या. तर बुमराहने 24 कसोटी सामन्यात 100 विकेट्स घेतल्या. 


तीन वर्षांपूर्वी कसोटीत पदार्पण करणाऱ्या बुमराहने कपिल देव (25 कसोटी), मोहम्मद शमी (29), इरफान पठाण (29 कसोटी) यांना मागे टाक हा टप्पा गाठला आहे. बुमहारची गोलंदाजीतील सरासरी 22.45 आहे. जी पहिले 100 कसोटी विकेट घेतलेल्या भारतीय गोलंदाजांपैकी उत्तम आहे. जसप्रीत बुमराहने 67 एकदिवसीय सामन्यांत 108 विकेट घेतल्या आहेत. तर 50 टी -20 सामन्यांमध्ये 59 विकेट घेतले आहेत. 


चौथ्या कसोटीत टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय


भारताने चौथ्या ओव्हल कसोटीत दणदणीत विजय साजरा केला आहे. भारताने इंग्लंडचा 157 धावांनी पराभव केला. भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे. गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही बाजूने टीम इंडियाने चमकदार कामगिरी केली. या कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने 50 वर्षांनंतर ओव्हलमध्ये ऐतिहासिक विजय साजरा केला.  


दुसऱ्या डावात इंग्लंडची सुरुवात चांगली झाली. इंग्लंडच्या सलामीच्या फलंदाजांनी 100 धावांची भागीदारी केली. मात्र हे सातत्य मधल्या फळीतील खेळाडूंना राखता आलं नाही. इंग्लंडकडून हासीब हमीदने 193 चेंडूत सर्वाधिक 63 धावा केल्या. तर रॉरी बर्न्सने 125 चेंडूत 50 धावा केल्या. कर्णधार जो रुटने 36, ख्रिस वोक्सने 18, क्रिग ओव्हर्टन 10, ओली रॉबिनसनने 10 धावा केल्या. मधल्या फळीतील खेळाडू भारतीय गोलंदाजांसमोर खेळपट्टीवर टीकू शकले नाहीत. भारताकडून दुसऱ्या डावात सर्वाधिक 3, जसप्रीत बुमराह, रवींद्र जाडेजा, शार्दुल ठाकूरने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.


रोहितचं विदेशातील पहिलं शतक


रोहित शर्माने पहिल्यांदा विदेशातील आपले कसोटी शतक पूर्ण केले. रोहितने 204 बॉलमध्ये एक षटकरासह आणि 12 चौकरासह आपले शतक पूर्ण केले. टेस्ट क्रिकेटमध्ये रोहितने आठवे शतक पूर्ण केले.