IND vs ENG : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात झाली असून पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दुसऱ्या दिवसाअखेरीस इंग्लंडची धावसंख्या 555 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 8 विकेट्स गमावले आहेत. इंग्लंडच्या संघानं दुसऱ्या दिवशी पाच विकेट्स गमावत 292 धावा केल्या. डोम बेस 28 आणि लीच सहा धावांवर खेळत आहे. टीम इंडियाकडून अश्विन, बुमराह, इशांत आणि शाहबाज नदीम यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या आहेत.


कर्णधार जो रूटच्या कारकिर्दीतील पाचव्या दुहेरी शतकाच्या जोरावर इंग्लंडनं एमए चिदंबरम स्टेडियमवर भारतासोबत सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवसापर्यंत पहिल्या डावात 8 बाद 555 धावा उभारल्या आहेत. आजच्या दिवसातील पहिल्या दोन सत्रांवर पूर्णपणे इंग्लंडचं वर्चस्व दिसून आलं. शेवटच्या सत्रात भारतीय गोलंदाजांना काहीसं यश मिळालं. पण रूटच्या धमाकेदार खेळीमुळे इंग्लंडने पहिल्याच डावात धावांचा डोंगर उभारला.





जो रूट आणि बेन स्टोक्स यांनी दुसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात केली. इंग्लंडने तीन बाद 263 धावांच्या पुढे खेळण्यास सुरवात केली. रूटने आपला डाव 128 धावांनी वाढवला. नवीन फलंदाज म्हणून स्टोक्स मैदानात उतरला. दोन्ही फलंदाजांनी फलक हलता ठेवला आणि पाहुण्या संघाला दुपारच्या जेवणापर्यंत कोणताही धक्का बसू दिला नाही.


स्टोक्स बाद झाल्यावर फलंदाजीसाठी आलेल्या ओली पोपने इंग्लंडला टी ब्रेकपर्यंत आणखी कोणताही फटका बसू दिला नाही. टी ब्रेकपूर्वी रुटने आपले दुहेरी शतक पूर्ण केले. अश्विनला षटकार मारत त्याने आपले दुहेरी शतक पूर्ण केले. रूट हा पहिला इंग्लिश क्रिकेटपटू ठरला आहे की, त्याने षटकार खेचत आपले दुहेरी शतक पूर्ण केले. हे रूटचे देशाबाहेर तिसरे दुहेरी आणि शेवटच्या तीन कसोटीतील त्याचे दुसरे दुहेरी शतक आहे. त्यानंतर पोप (34), बटलर (30) हे लगेच माघारी परतले. त्यानंतर डॉम बेस (28) आणि जॅक लीच (6) यांनी दिवसाचा खेळ संपेपर्यंत मैदानावर तळ ठोकला.


दरम्यान, भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या PayTM Test match मध्ये जो रुटनं संघासाठी नाणेफेक जिंकत प्रथन फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.


महत्त्वाच्या बातम्या :