India vs England: भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी कर्णधार ज्यो रुटच्या शतकाच्या बळावर इंग्लंडच्या संघाने 3 बाद 263 धावांपर्यंत मजल मारत खेळावर पूर्ण वर्चस्व राखलं आहे. पहिल्या सत्रात दोन गडी गमावल्यानंतर संपूर्ण दिवस सलामीवीर डॉम सिबली-जो रूट जोडीने खेळून काढला आणि संघाला भक्कम स्थितीत आणले. रूटने नाबाद शतक (128) ठोकलं, पण सिबली मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये 87 धावांवर बाद झाला.
इंग्लंडचा कर्णधार रुटनं शतक लगावल्यानंतर सांगितलं आहे की, त्यांची टीम पहिल्या डावात 600 ते 700 धावांचा स्कोर उभा करु शकते. रूटचा 100वा कसोटी सामना आहे. तो म्हणाला की, मी दुसऱ्या दिवशीही मोठी खेळी करण्यास इच्छुक आहे. काल पहिल्या दिवशी मांसपेशी दुखावल्याने थोडा त्रास होतोय. हे थोडं निराशाजनक आहे. मात्र भारतीय कर्णधार विरोट कोहलीनं यावेळी माझी मदत केली हे त्याच्या चांगल्या खेळभावनेचं दर्शन आहे, असं तो म्हणाला.
रुट म्हणाला की, आम्ही आज अधिकाधिक धावा बनवू. पहिल्या डावात जास्तीत जास्त धावा बनवणं ही चांगली गोष्ट असते. आम्ही 600-700 धावा करु शकू, असं तो म्हणाला.
काल पहिल्या दिवशी इंग्लंडची फलंदाजी मजबूत होताना दिसून आली. सिब्ले आणि जो रुट यांच्या संयमी आणि प्रसंगी आक्रमक खेळीमुळं इंग्लंडच्या संघानं पाहता पाहता धावसंख्येचा द्विशतकी आकडा ओलांडला. पुढं पहिल्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वीच, बुमराहला ही भागीदारी तो़डण्यात यश मिळालं. सिब्लेला शतकापासून अवघ्या 13 धावा दूर असतानाच बाद करत त्यानं संघाला मोठं यश मिळलून दिलं. पण, अद्यापही खेळपट्टीवर जो रुट हजर असल्यामुळं आता दुसऱ्या दिवशी हा पाहुणा संघं धावसंख्येत आणखी किती भर टाकतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
उपहारासाठीच्या विश्रांतीनंतर रुटनं 4 आणि सिब्लेनं 26 धावांपासून पुन्हा एकदा खेळीला सुरुवात केली. याचदरम्यान संयमी खेळाचं प्रदर्शन करत सिब्लेनं क्रिकेट कारकिर्दीतील चौथं अर्धशतक पूर्ण केलं. चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियममध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पाहुण्या संघानं 263 धावांचा डोंगर रचला. आतापर्यंत इंग्लंडच्या संघानं तीन गडी गमावत ही धावसंख्या गाठली आहे.
पहिल्या सत्रात संघातील कोणताही गडी न गमावणाऱ्या इंग्लंडनं उपहारापूर्वीच पहिला गडी गमावला. बर्न्स हा 33 धावा करत तंबूत परतला. डॅनिअल लारेंसलाही खेळपट्टीवर बुमहारनं फार काळ टीकून दिलं नाही. पण, त्यानंतर मात्र इंग्लंडच्या फलंदाजीत एक दमदार भागिदारी पाहायला मिळाली. पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांपैकी आर. अश्विनला 1 आणि बुमराहला 2 गडी बाद करण्यात यश मिळालं.