भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट (Cricket) सामन्यात आज चौकार आणि षटकारांचा पाऊस पडला. दोन दिवस पावसामुळे व्यत्यय आलेल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी बांगलादेशचा डाव 233 धावांत गुंडाळल्यानंतर भारतीय संघाने फलंदाजीने मैदाना गाजवलं. कसोटी क्रिकेट सामन्यात कधी कधी 3 षटकात 1 किंवा 2 धावा घेतल्या जातात. कारण, संथ गतीने खेळले जाणारे सामने म्हणून आपण कसोटी क्रिकेटकडे पाहतो. मात्र, रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वातील भारतीय संघाने कसोटी सामन्यातही टी-20 सामन्यांप्रमाणे तुफानी फलंदाजी करत एकाच सामन्यात तीन सर्वात मोठे रेकॉर्ड भारतीय संघाच्या नावावर केले आहेत. त्यामध्ये, सर्वात जलद अर्धशतक, शतक, दीडशतक आणि द्विशतक झळकावण्याचा विक्रम भारतीय संघाच्या नावे जमा झाला आहे. 


बांगलादेशचा पहिला डाव 233 धावांत गुंडाळल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी धडाकेबाज सुरुवात केली. कसोटी सामन्यात पहिल्या 3 षटकातच अर्धशतक झळकावत नवा विक्रम रचला. कसोटी सामन्यात अगदी टी-20 सामन्याप्रमाणे फलंदाजी करत प्रेक्षकांसाठी पैसे वसुल खेळी ठरली. त्यामुळे, आजच्या कसोटी सामन्याची क्रिकेट विश्वात चांगलीच चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे केवळ 50 धावांच्या विक्रमांवरच न थांबता भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतक, शतक, दीडशतक, द्विशतकही झळकावले. त्यामध्ये, रोहित आणि जैस्वाल यांनी 36 चेंडूत अर्धशतक झळकावले होते.  


टीम इंडियाने 3 षटकात सर्वात जलद अर्धशतक झळकावले. त्यानतंर, 10.1 षटकांत म्हणजे 61 चेंडूत 100 झळकावले. तर, 18.2 षटकांत म्हणजे 110 चेंडूत दीडशतक पूर्ण केले होते. विशेष म्हणजे 24.2 षटकांत 200 आणि 30.1 षटकांत म्हणजेच 181 चेंडूत 250 धावा झळकवण्याचा विक्रम टीम इंडियाने आपल्या नावावर केला आहे. भारताचा हा रेकॉर्ड म्हणजे कसोटी क्रिकेटमधील आत्तापर्यंत सर्वात जलद फलंदाजीचा विश्वविक्रम आहे. 






यापूर्वी इंग्लंडने केला होता विक्रम


यशस्वी जैस्वालने पहिल्या षटकांतच सलग तीन चौकार ठोकले, त्यामुळे दोघेही फॉर्ममध्ये राहिले आणि 18 चेंडूतच जलद अर्धशतक झळकावत नवा विक्रम रचला. यापूर्वी हा विक्रम इंग्लंड संघाच्या नावावर होता, इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्ध 26 चेंडूत 50 धावा झळकावत कसोटी क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतक झळकावले होते. मात्र, आता भारताने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.  तर, सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम भारताच्या नावे होता, त्यामुळे टीम इंडियाने 2023 मधील स्वत:चाच रेकॉर्ड तोडला आहे. भारताने वेस्टइंडिजविरुद्ध 74 चेंडूत जलद शतक झळकावले होते. आता, केवळ 61 चेंडूत सर्वात जलद शतक झळकावले आहे. 


हेही वाचा


Ind vs Ban: कसोटी हाय का टी-20, चौकार-षटकारांची आतषबाजी; 285 धावांवर भारताचा डाव घोषित