IND vs BAN : भारत विरुद्ध बांग्लादेश (India vs Bangladesh) यांच्यात सुरु पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला पूर्ण 50 षटकंही खेळता आली नाहीत. भारतीय संघ 41.2 षटकात 186 धावांवर गारद झाला. टीम इंडियासाठी केएल राहुलने सर्वाधिक 73 धावा केल्या. त्याच्याशिवाय जवळपास सर्वच फ्लॉप ठरले.त्यामुळे भारतीय फलंदाजांच्या फ्लॉप शोनंतर सोशल मीडियावर चाहते भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची आठवण काढताना दिसले. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी असता तर परिस्थिती इतकी बिकट झाली नसती, असं मत सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी दिलं. यासोबतच चाहते सोशल मीडियावर वेगवेगळे मीम्स शेअर करताना दिसून आले. यातील काही खास मीम्स पाहूया...














केएलची एकहाती झुंज


बांगलादेशचा स्टार ऑलराऊंडर शाकिब अल हसन याने अप्रतिम गोलंदाजी करत भारताचे महत्त्वाचे विकेट्स घेतले असले तरी स्टार फलंदाज केएल  राहुलने पुन्हा फॉर्मात परतत 73 धावांची एकहाती झुंज देत दिली. ज्यामुळे भारत किमान 186 धावांपर्यत पोहचू शकला. इतर फलंदाजांचा विचार करता, सलामीवीर शिखर आणि रोहित अनुक्रमे 7 आणि 27 धावा करुन बाद झाले. विराटही 9 धावांवर एका अप्रतिम कॅचचा शिकार झाला. त्यानंतर श्रेयस आणि केएल यांनी काही काळ डाव सावरला. पण श्रेयस 24 धावा करुन बाद झाला. मग वॉशिंग्टन सुंदरही 19 धावा करुन तंबूत परतला. दुसऱ्या बाजूने केएल राहुलने एकहाती झुंज कायम ठेवत अर्धशतक पूर्ण केलं. पण त्यानंतर खालच्या फळीतील फलंदाज दुहेरी संख्याही गाठू शकले नाहीत. अखेर 186 धावांवर भारतीय संघ सर्वबाद झाला. राहुलने 70 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकार ठोकत 73 धावा केल्या.


 हे देखील वाचा-