ICC Test Batman Ranking : क्रमवारीत पंतचा डंका! रोहितला मोठा धक्का तर विराट कोहली टॉप-10मधून बाहेर
भारत आणि बांगलादेश यांच्यात चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यातील खराब कामगिरीमुळे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठा फटका बसला आहे. त्याचवेळी 632 दिवसांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या आणि शतक झळकावणाऱ्या ऋषभ पंतने टॉप-10 फलंदाजांमध्ये प्रवेश केला आहे. दुसरा शतकवीर शुभमन गिललाही फायदा झाला आहे. जाणून घ्या टेस्ट रँकिंगमधील टॉप-10 फलंदाज कोण आहेत?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफलंदाजांच्या क्रमवारीत इंग्लंडचा फलंदाज जो रूट पहिल्या स्थानावर आहे. त्याच्या खात्यात 899 रेटिंग गुण आहेत. केन विल्यमसन (852) दुसऱ्या स्थानावर, डॅरिल मिशेल (760) तिसऱ्या आणि स्टीव्ह स्मिथ (757) चौथ्या स्थानावर आहे.
चेन्नई कसोटीच्या पहिल्या डावात बांगलादेशविरुद्ध 56 धावांची खेळी करणाऱ्या जैस्वालला एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो सहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहोचला आहेत. तो भारताचा अव्वल क्रमांकाचा फलंदाज बनला आहे.
बांगलादेशविरुद्ध चेन्नई कसोटीत शतक झळकावणाऱ्या ऋषभ पंतने सहाव्या क्रमांकावर कब्जा केला आहे. त्याच्या खात्यात 731 रेटिंग गुण आहेत. तो भारताचा दुसरा टॉप रँकिंग बॅट्समन आहे.
ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज उस्मान ख्वाजा सातव्या स्थानावर तर पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान सातव्या स्थानावर पोहोचला आहे. तर ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅबुशेनही संयुक्त आठव्या स्थानावर पोहोचला आहे.
चेन्नई कसोटीत अपयशी ठरलेल्या रोहित शर्माने फलंदाजांच्या क्रमवारीत पाचव्या स्थानावरून थेट दहाव्या स्थानावर आला आहे.
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली चेन्नई कसोटीच्या दोन्ही डावात केवळ 23 धावा करू शकला, त्यामुळे सातव्या स्थानावरून थेट 12व्या स्थानावर पोहोचला आहे. पाकिस्तानचा बाबर आझम 11व्या स्थानावर आहे.