India vs Bangladesh 1st Chennai Red Soil Pitch : भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. ही मालिका 19 सप्टेंबरपासून सुरू होणार असून पहिला सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. यासाठी चेन्नईमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघानेही सराव सुरू केला आहे.


मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि भारतीय कर्णधार रोहित शर्माने या कसोटी सामन्यासाठी खास प्लान तयार करत आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना लाल मातीच्या खेळपट्टीवर खेळवला जाऊ शकतो, असे झाल्यास बांगलादेशच्या अडचणी वाढू शकतात. कसोटी क्रिकेटमध्ये खेळपट्टीमुळे खूप फरक पडतो.  


भारताचा कसोटी हंगाम खूप मोठा असणार आहे, ज्यामध्ये भारतीय संघाला एकूण 10 कसोटी सामने खेळायचे आहेत. बांगलादेशविरुद्धच्या 2 कसोटी सामन्यांनंतर, टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात 3 कसोटी सामने खेळायचे आहेत आणि त्यानंतर बॉर्डर-गावसकर ट्रॉफी अंतर्गत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करायचा आहे. अशा स्थितीत भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध चांगली कामगिरी करून मोसमाची सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल. याच कारणामुळे आता गौतम गंभीर आणि रोहित शर्मा विशेष खेळी करण्याचा विचार करत आहेत, जो बांगलादेशसाठी धक्कादायक ठरू शकतो.


चेन्नई कसोटीसाठी लाल मातीची खेळपट्टी?


खरं तर, एका मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, चेन्नईमध्ये होणाऱ्या कसोटीसाठी लाल मातीची खेळपट्टी वापरली जाऊ शकते. बांगलादेशची ताकद कमी करण्यासाठी हे केले जात आहे, कारण त्यांच्या खेळाडूंना काळ्या मातीच्या खेळपट्ट्यांवर खेळण्याची सवय आहे आणि फिरकी गोलंदाजही अधिक प्रभावी आहेत. या कारणास्तव, भारताला लाल मातीच्या खेळपट्टीसह त्यांच्या फिरकी गोलंदाजीची धार कमी करायची आहे. 


बांगलादेशकडे फिरकीमध्ये शाकिब अल हसन, तैजुल इस्लाम आणि मेहदी हसन मिराजसारखे फिरकी गोलंदाज आहेत, जे आपल्या फिरकीने फलंदाजांना चकवा देण्यात पटाईत आहेत. मात्र, खेळपट्टीबाबत अद्याप निश्चितपणे काहीही सांगता येणार नाही, कारण सामन्याला अजून पाच दिवस बाकी आहेत. पण टीम इंडियाने शुक्रवारपासून एमए चिदंबरम स्टेडियमवर कॅम्पला सुरुवात केली आहे. विराट कोहली, रोहित शर्मा आणि रविचंद्रन अश्विनसह अनेक खेळाडू घाम गाळत आहे. आणि चेन्नईत 3-4 दिवसात बांगलादेशचा गेम करण्याची तयारी करत आहे. 


हे ही वाचा -


Vishnu Vinod : 32 चेंडूत 17 षटकार अन् शतक... मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचा मैदानात धुमाकूळ, पाहा Video