अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) भारत (India) विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) विश्वचषकाच्या (World Cup) अंतिम सामन्याची लढत पाहायला मिळतेय. याचदरम्यान सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मीम्सचा पाऊस पाडलाय. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाला चाहत्यांच्या अपेक्षेइतक्या धावा करता आल्या नाहीत.
मोठे फलंदाज आऊट झाल्यानंतर आणखी एका मोठ्या फलंदाज केएल राहुलने भारताजी बाजू सावरली. यावर सोशल मीडियावर अनुष्का शर्मा आणि अथिया शेट्टीचा एक फोटा मीम्स म्हणून शेअर केला जातोय.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांचा फोटो शेअर करताना एका यूजरने त्यावर लिहिले की, जय शाहवर विश्वास ठेवा. अहो भारतीयांनो, माझ्यावर विश्वास ठेवा, पहिल्या इनिंगपासूनच आम्ही स्क्रिप्टनुसार खेळलो तर शंका येईल.
दरम्यान पंतप्रधान मोदी यांचा देखील एक मीम सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. एकमेव फलंदाज जो भारताला तारु शकतो, अशा आशयाचा मीम सोशल मीडियावर शेअर केलं जातंय.
एक व्हिडिओ क्लिप शेअर करण्यात आली होती, ज्यामध्ये एक व्यक्ती टीव्हीसमोर पडदा घेऊन बसलेली आहे आणि निराश मूडमध्ये पडदा उचलून टीव्हीच्या स्क्रीनकडे डोकावतो. कोहली बाद झाल्यानंतर भारतीय चाहत्यांची स्थिती म्हणून ही पोस्ट करण्यात आली.
दरम्यान भारताचे सगळे तगडे फलंदाज बाद झाल्यानंतर ती पारी सुर्यकुमार यादवकडे आली. पण तो देखील बाद झाला आणि भारताचा डाव डगमगल्याचं पाहायला मिळालं. जेव्हा सुर्यकुमार फलंदाजी करण्यासाठी उतरला तेव्हा त्याच्यावरचा देखील मीम सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. एका दक्षिण भारतीय चित्रपटातील एक दृश्य शेअर करताना एका यूजरने लिहिले की, "मला वाटते की सूर्य कुमार यादवसाठी विश्वचषकाचा हिरो बनण्याची ही सर्वात मोठी संधी आहे, सूर्या भाई याचा वापर करा."
एका यूजरने लिहिले की, भारतीय लोक ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला विचारत आहेत, "भाऊ, तुम्ही काय करत आहात?"
आम्ही तुम्हाला सांगतो की अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीएम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्माने चांगली सुरुवात केली पण 47 धावा केल्यानंतर तो बाद झाला, तर शुभमन गिल केवळ 4 धावा करू शकला. विराट कोहलीही अर्धशतक झळकावून बाद झाला. श्रेयार अय्यर आणि रवींद्र जडेजा यांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. केएल राहुलने डाव सांभाळला आणि 66 धावांचे योगदान देऊन बाद झाला.