India vs Australia 2023 World Cup Final : टीम इंडियाचा महामुकाबला अहमदाबादमधील जगातील सर्वात मोठ्या नरेंद मोदी स्टेडियमवर वर्ल्डकपचा महामुकाबला होत आहे. टीम इंडियाची या सामन्यात नेहमीची धमाकेदार सुरुवात झाली नाही, पण टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि किंग कोहलीनं विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे.  

वर्ल्डकपच्या इतिहासात एकाच मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम किंग कोहलीनं आपल्या नावावर केला आहे. आजच्या सामन्यात त्याने 44 धावा केल्यानंतर आयसीसी स्पर्धेत आणखी एक विक्रम आपल्या नावे केला. आयसीसी स्पर्धेच्या फायनलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम कोहलीनं आपल्या नावे केला.  

दुसरीकडे, रोहितला विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी 29 धावांची आणि फक्त दोन सिक्सची गरज होती. त्याने सुद्धा हा पराक्रम आपल्या नावे केला. दोन सिक्स मारत रोहितने ख्रिस गेलच्या नावावर असलेला सिक्सरचा विक्रम आपल्या नावावर केला.

कॅप्टन रोहित शर्मा अंतिम सामन्यात 31 चेंडूत 47 धावा करून बाद झाला, पण त्याने एक शानदार विश्वविक्रम रचला. रोहित आता कोणत्याही एका विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा कर्णधार बनला आहे. रोहित शर्माने या विश्वचषकातील 11 सामन्यांमध्ये एकूण 597 धावा केल्या आहेत, जो विश्वचषकाच्या इतिहासात कोणत्याही कर्णधाराने केलेल्या सर्वाधिक धावांचा विक्रम आहे. 

या विक्रमात रोहितने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन, श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने, माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटिंग आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आरोन फिंच यांना मागे टाकले आहे.

  • केन विल्यमसनने 2019 च्या विश्वचषकात कर्णधार म्हणून 578 धावा केल्या होत्या.
  • माहेला जयवर्धनेने 2007 च्या विश्वचषकात कर्णधार म्हणून 548 धावा केल्या होत्या.
  • रिकी पाँटिंगने 2003 च्या विश्वचषकात कर्णधार म्हणून 539 धावा केल्या होत्या.
  • आरोन फिंचने 2019 विश्वचषक स्पर्धेत कर्णधार म्हणून 507 धावा केल्या होत्या.

इतर महत्वाच्या बातम्या