India vs Australia 2023 World Cup Final : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषकाचा अंतिम सामना सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आणि त्यानंतर रोहितने अल्पावधीतच नवा विश्वविक्रम केला. रोहित शर्मा आता कर्णधार म्हणून विश्वचषक हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे.
रोहित शर्माने नवा विक्रम केला
रोहित शर्मा या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात 31 चेंडूत 47 धावा करून बाद झाला, पण त्याने एक शानदार विश्वविक्रम रचला. रोहित आता कोणत्याही एका विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा कर्णधार बनला आहे. रोहित शर्माने या विश्वचषकातील 11 सामन्यांमध्ये एकूण 597 धावा केल्या आहेत, जो विश्वचषकाच्या इतिहासात कोणत्याही कर्णधाराने केलेल्या सर्वाधिक धावांचा विक्रम आहे. या विक्रमात रोहितने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन, श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने, माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटिंग आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आरोन फिंच यांना मागे टाकले आहे.
- केन विल्यमसनने 2019 च्या विश्वचषकात कर्णधार म्हणून 578 धावा केल्या होत्या.
- महेला जयवर्धनेने 2007 च्या विश्वचषकात कर्णधार म्हणून 548 धावा केल्या होत्या.
- रिकी पाँटिंगने 2003 च्या विश्वचषकात कर्णधार म्हणून 539 धावा केल्या होत्या.
- आरोन फिंचने 2019 विश्वचषक स्पर्धेत कर्णधार म्हणून 507 धावा केल्या होत्या.
टीम इंडिया अडचणीत
मात्र, या सामन्यात भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. हे वृत्त लिहेपर्यंत टीम इंडियाने 16 षटकांत 3 गडी गमावत 101 धावा करून आपल्या तीन मुख्य विकेट गमावल्या होत्या. टीम इंडियाकडून शुभमन गिल अवघ्या 4 धावा करून बाद झाला. त्यानंतर रोहितने 31 चेंडूत 47 धावा केल्या, पण मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात त्याची विकेट गेली. रोहित बाद झाल्यानंतर पुढच्याच षटकात फलंदाज श्रेयस अय्यरही केवळ 6 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. अशा स्थितीत टीम इंडियाच्या आशा आता क्रीजवर असलेल्या विराट कोहली आणि केएल राहुलवर टिकून आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या