India vs Australia BGT 2024-25 Test : भारतीय क्रिकेट संघ ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसरा कसोटी सामना खेळत आहे. या कसोटी सामन्यादरम्यान, एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये तीन मोठ्या खेळाडूंना संघातून मुक्त करण्यात आले आहे. संघातून सोडण्यात आलेले तिन्ही खेळाडू वेगवान गोलंदाज आहेत, आणि आता त्यांना भारतात परत पाठवले जात आहे. 


बीसीसीआयने मोठा निर्णय घेत बॉर्डर गावसकर ट्रॉफी मालिकेदरम्यान वेगवान गोलंदाज यश दयाल, मुकेश कुमार आणि नवदीप सैनी यांना भारतात परत पाठवले आहे. या 3 खेळाडूंना भारतात परत पाठवण्यात आले आहे. कारण विजय हजारे ट्रॉफी 21 डिसेंबरपासून सुरू होत असून हे सर्व खेळाडू आपापल्या संघाकडून खेळताना दिसणार आहेत.






हे तीन वेगवान गोलंदाज बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच भारतीय संघासोबत होते. पण संघ व्यवस्थापनाला असे वाटले की, ब्रिस्बेन सामन्यानंतर आता फक्त दोन कसोटी सामने बाकी आहेत, त्यामुळे आता त्याचे थांबणे काही योग्य नाही. भारत आपले पुढील सामने मेलबर्न आणि सिडनी येथे खेळेल आणि त्यानंतर मायदेशी परतेल. ऑस्ट्रेलियन दौरा मुकेशसाठी थकवणारा दौरा ठरला आहे, कारण तो बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेपूर्वी दोन सामन्यांसाठी भारत अ संघासोबत येथे पोहोचला होता. पण आठवडाभरात सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये बंगालकडून खेळण्यासाठी तो सज्ज आहे. 


विशेष म्हणजे यश दयालचा सुरुवातीला राखीव खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला नव्हता, मात्र डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमद दुखापत झाल्यानंतर त्याच्या जागी त्याचा संघात समावेश करण्यात आला होता. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, यश आधीच ऑस्ट्रेलिया सोडले असून आगामी स्पर्धेसाठी तो उत्तर प्रदेशला जाण्याची तयारी करत आहे. जोपर्यंत सैनीचा संबंध आहे, तो ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर भारत अ संघाचा एकच सामना खेळला आहे आणि तेव्हापासून तो नेट ड्युटीवर आहे. आता तो पण लवकर भारतात येणार आहे.


विजय हजारे ट्रॉफीसाठी बंगालचा संघ : सुदीप कुमार घरामी (कर्णधार), मोहम्मद शमी, अनुस्तुप मजुमदार, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), सुदीप चॅटर्जी, करण लाल, शाकीर हबीब गांधी (यष्टीरक्षक), सुमंत गुप्ता, सुभम चॅटर्जी, रणज्योतसिंग खैरा, प्रदीपता प्रामाणिक, कौशिक सिंग, कौशिक सिंग, मुकेश कुमार, सक्षम चौधरी, रोहित कुमार, मोहम्मद कैफ, सूरज सिंधू जैस्वाल, सायन घोष, कनिष्क सेठ.


हे ही वाचा -


Ind vs Aus 3rd Test : DSP सिराजच्या 'ट्रिक'मध्ये लॅबुशेन फसला; नितीश रेड्डीचा बॉल अन् कोहलीचा 'तो' कॅच, जाळ्यात कसं अडकवलं, VIDEO


Pakistan Cricket : हा कोणाता ट्रेंड... 36 तासांत पाकिस्तानच्या 3 दिग्गजांनी घेतली निवृत्ती! आता 7 फुटाच्या खेळाडूने ठोकला रामराम