India Squad Against AUS : दुसऱ्या कसोटी सामन्यात भारातने ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्सने पराभव केला. या विजयासह भारताने बॉर्डर-गावस्कर मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. दिल्ली कसोटीनंतर बीसीसीआयने अखेरच्या दोन कसोटी सामन्यासाठी आणि वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची निवड केली आहे. गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्ममध्ये असणाऱ्या केएल राहुल याच्यावर बीसीसीआयने पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. तर दुसरीकडे काही युवा आणि अनुभवी खेळाडू मात्र प्रतिक्षेतच आहेत. अखेरच्या दोन कसोटी सामन्यासाठी मयांक अग्रवाल, उमरान मलिक अथवा सरफराज खान याला संधी मिळेल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, या खेळाडूंच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडली आहे.
सरफराज खान
मुंबईचा युवा फलंदाज सरफराज खान याने गेल्या काही वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. ज्या ज्या वेळीस भारतीय संघाची निवड होते, तेव्हा तेव्हा सरफराज याच्या नावाची चर्चा होते. पण आज त्याच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडली आहे. खराब फॉर्ममध्ये असणाऱ्या राहुलवर बीसीसीआयने विश्वास दाखवला आहे. तर दुसरीकडे सरफराज खानची प्रतिक्षा मात्र कायम आहे.
मयांक अग्रवाल
रणजी ट्रॉफी 2023 च्या हंगामात मयांक अग्रवाल याने धावांचा पाऊस पाडला आहे. मयांकच्या नावावर सर्वाधिक धावांची नोंद आहे. मयांकने कर्नाटकसाठी 9 सामन्यात 990 धावांचा पाऊस पडलाय. त्यानंतरही मयांकला संघात स्थान मिळवता आले नाही. गेल्या काही दिवसांपासून मयांक भारतीय संघाबाहेर आहे.
उमरान मलिक
जम्मू-कश्मीरचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक यालाही टीम इंडियात स्थान मिळाले नाही. त्याच्या वेगामुळे त्याला टीम इंडियात स्थान मिळाले, असे क्रीडा चाहत्यांना वाटत होतं. कारण, जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत तो वेगवान गोलंदाजाची कमी भरुन काढेल, असं वाटत होतं. पण निवडकर्त्यांनी त्याला स्थान दिलं नाही.
अखेरच्या दोन सामन्यासाठी कोण कोण संघात?
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर , सूर्यकुमार यादव, उमेश यादव आणि जयदेव उनादकट.
वनडे मालिकेसाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वाशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, जयदेव उनादकट.