Australia vs India 2nd Test : भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियात असून बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटीच्या तयारीत व्यस्त आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना ॲडलेडमध्ये पिंक बॉलने खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ ॲडलेडमध्ये जोरदार सराव करत आहेत. यावेळी दोन्ही संघांच्या सरावाचाही प्रेक्षक आनंद लुटत आहेत.
खरंतर, 3 नोव्हेंबरला भारतीय खेळाडूंचा सराव पाहण्यासाठी चाहत्यांसाठी मैदान खुले करण्यात आले होते. ऑस्ट्रेलियाचे सराव सत्र पाहण्यासाठी मर्यादित संख्येने प्रेक्षक आले होते, तर हजारो लोक भारतीय संघ पाहण्यासाठी जमले होते. यादरम्यान असे काही घडले ज्यामुळे बीसीसीआयला कठोर कारवाई करावी लागली.
खरंतर, ॲडलेडमध्ये हजारो चाहते भारतीय संघाचा सराव पाहण्यासाठी पोहोचले तेव्हा काही प्रेक्षकांच्या 'अभद्र' टिप्पण्यांमुळे खेळाडूंना त्रास झाला. त्यामुळे शुक्रवारी सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी बीसीसीआयने आता मोठा निर्णय घेतला आहे. आणि आता भारताच्या सराव सत्रात चाहत्यांना यांची परवानगी दिली जाणार नाही.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, ऑस्ट्रेलियाच्या सराव सत्रादरम्यान 70 पेक्षा जास्त लोक आले नाहीत, परंतु भारतीय खेळाडूंच्या सत्रादरम्यान सुमारे 3000 लोक उपस्थित होते. इतके चाहते येतील अशी कोणालाच अपेक्षा नव्हती.
तो म्हणाला, 'सिडनीमध्ये (पाचव्या कसोटीपूर्वी) आणखी एक दिवस चाहत्यांसाठी ठेवला होता, पण तो रद्द करण्यात आला आहे, कारण येथे केलेल्या असभ्य आणि असंवेदनशील टिप्पण्यांमुळे खेळाडू खूप दुखावले गेले. काही चाहत्यांनी संघातील खेळाडूंच्या फिटनेसवर असभ्य कमेंट्स केल्या.
विराट कोहली आणि शुबमन गिलसारख्या खेळाडूंना सरावात अनेक लोकांमुळे अडचणीचा सामना करावा लागला. काही लोक त्यांच्या मित्रांसोबत फेसबुक लाईव्ह करत होते आणि फलंदाज खेळत असताना जोरात बोलत होते. तो म्हणाला की, एक चाहता एका खेळाडूला गुजरातीमध्ये 'हाय (ग्रीटिंग)' म्हणण्याची विनंती करत होता. एका चाहत्याने एका विशिष्ट खेळाडूच्या शरीराबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली होती. त्यामुळे बीसीसीआयने आता एक मोठे पाऊल उचलले आहे.
हे ही वाचा -