एक्स्प्लोर

IND vs AUS, LIVE Score : हेड-मार्श जोडीची शतकी भागिदारी, ऑस्ट्रेलियाचा भारतावर 10 विकेट्सनी विजय

India vs Australia : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील दुसरा एकदिवसीय सामना विशाखापट्टणमच्या क्रिकेट स्टेडियमवर सामना खेळवला जात आहे.

LIVE

Key Events
IND vs AUS, LIVE Score : हेड-मार्श जोडीची शतकी भागिदारी, ऑस्ट्रेलियाचा भारतावर 10 विकेट्सनी विजय

Background

IND vs AUS, Live : पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने अप्रतिम गोलंदाजी केली. सिराज आणि शामी यांच्या धारधार गोलंदाजीपुढे कांगारुंनी लोटांगण घातले. ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या 188 धावांत संपुष्टात आला होता. त्यानंतर 189 धावांचा पाठलाग करताना भारताचे फलंदाज फेल होताना दिसत होते. पण तेव्हाच केएल राहुलचे अर्धशतक आणि रविंद्र जाडेजाची संयमी खेळी याच्या बळावर भारताने पहिल्या वनडे सामन्यात पाच विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारताने तीन सामन्याच्या वनडे मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली होती. ज्यानंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात आज (19 मार्च) एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळवला जात आहे. आता आजचा सामना जिंकून भारत ऑस्ट्रेलियाविकरुद्ध एकदिवसीय मालिकाविजय मिळवू शकतो. याआधी भारतानं कसोटी मालिकेत कांगारुंना 2-1 ने मात दिली असून आता एकदिवसीय मालिका विजयासाठीही भारत सज्ज झाला आहे. यंदाच्या वर्षीच एकदिवसीय चषक खेळवला जाणार असल्याने दोन्ही संघासाठी ही एकदिवसीय मालिका महत्त्वाची आहे.

सामना होणाऱ्या विशाखापट्टणमच्या क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी उपयुक्त आहे. या स्टेडियमवर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 241 आहे, जी दुसऱ्या डावात 211 पर्यंत खाली घसरते. खेळपट्टी सामान्यतः फलंदाजीसाठी चांगली असली तरी स्लो गोलंदाजी करणाऱ्यांना देखील मदत करते. पण आज पावसाची शक्यता असल्याने परिस्थिती  वेगळी असू शकते. वेगवान गोलंदाजांना देखील फायदा मिळू शकतो. तसंच या ठिकाणी खेळल्या गेलेल्या 14 सामन्यांपैकी 9 संघाने पाठलाग करून जिंकले आहेत. त्यामुळे जो कोणी संघ नाणेफेक जिंकतो, त्याला कदाचित या रेकॉर्डवर टिकून राहावेसे वाटेल आणि प्रथम गोलंदाजी घेण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार विशाखापट्टणमसह आंध्र प्रदेशच्या अनेक भागांत ढगाळ वातावरण आहे आणि पाऊस पडत आहे. आज दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. विशाखापट्टणममधील सामन्यादरम्यान तापमान 26 ते 23 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. दुपारनंतर येथे पावसाची 80 टक्के शक्यता आहे. तिथे रात्रीही पावसाची 50 टक्के शक्यता आहे. अशा परिस्थितीत, सामना खेळवताना व्यत्यय येऊ शकतो. तसेच, पावसामुळे सामना रद्द करावा लागण्याचीही शक्यता आहे.

कसे आहेत दोन्ही संघ?

भारताचा एकदिवसीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), युझवेंद्र चहल, इशान किशन, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, विराट कोहली, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, केएल राहुल, शुभमन गिल, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, जयदेव उनाडकट, वॉशिंग्टन सुंदर, सूर्यकुमार यादव.

17:31 PM (IST)  •  19 Mar 2023

IND vs AUS: 10 विकेट्सने ऑस्ट्रेलिया विजयी

भारताला 117 धावांत सर्वबाद केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता 11 षटकांत भारताचा 10 गडी राखून पराभव केला आहे ट्रेव्हिस हेड नाबाद 51 आणि मिचेल मार्श नाबाद 66 यांनी हा विजय मिळवून दिला आहे.

15:55 PM (IST)  •  19 Mar 2023

IND vs AUS : 117 धावांत भारत सर्वबाद

ऑस्ट्रेलियानं अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन करत भारतीय संघाला 117 धावांत सर्वबाद केलं असून ही भारताची आजवरची ऑस्ट्रेलियाविरुद्धची सर्वात कमी एकदिवसीय धावसंख्या आहे.

15:47 PM (IST)  •  19 Mar 2023

IND vs AUS : भारत सर्वबाद होण्याच्या उंबरठ्यावर

भारताचा नववा गडीही बाद झाला असून 116 धावांवर भारताचे 9 विकेट्स पडले आहेत.

14:28 PM (IST)  •  19 Mar 2023

IND vs AUS : निम्मा भारतीय संघ तंबूत परत

हार्दिक पांड्याही बाद झाल्यामुळे निम्मा भारतीय संघ तंबूत परतला आहे. स्टार्क याने चाक विकेट्स घेतल्या आहेत.

13:57 PM (IST)  •  19 Mar 2023

IND vs AUS : भारतीय संघ अडचणीत, तीन गडी बाद

भारतीय संघ अडचणीत दिसत असून शुभमन आणि सूर्युकमार शून्यावर बाद झाले असून रोहित शर्मा 13 धावा करुन तंबूत परतला आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget