India vs Australia 2nd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा दुसरा सामना 6 डिसेंबर रोजी खेळला जाणार आहे. हा डे-नाईट कसोटी सामना असेल, जो ॲडलेड ओव्हल येथे खेळला जाईल. मात्र दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड बाहेर असून त्याच्या जागी शॉन ॲबॉट आणि ब्रेंडन डॉगेटला ऑस्ट्रेलियन कसोटी संघात संधी मिळाली आहे. ॲबॉट याआधी ऑस्ट्रेलियाकडून एकदिवसीय आणि टी-20 खेळला आहे, परंतु डॉगेटने अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही.


शॉन ॲबॉट


32 वर्षीय शॉन ॲबॉटने ऑस्ट्रेलियाकडून आतापर्यंत 26 एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण 29 विकेट घेतल्या आहेत. त्याने 20 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण 26 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याचा रेकॉर्ड चांगला आहे, जिथे त्याच्या नावावर 261 प्रथम श्रेणी विकेट आहेत. त्याला अद्याप कसोटी पदार्पणाची संधी मिळाली नसली तरी एकदिवसीय आणि टी-20 मध्ये छाप पाडण्यात तो यशस्वी ठरला आहे. तो आयपीएलमध्ये आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबादकडूनही खेळला आहे.


2014 मध्ये ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू फिलिप ह्यूजचा शेफिल्ड शिल्ड स्पर्धेतील सामन्यादरम्यान चेंडू लागून मृत्यू झाला होता. तेव्हा शॉन ॲबॉट गोलंदाजी करत होता. त्याचा चेंडू ह्यूजच्या मानेच्या खालच्या भागात लागला होता, त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.




ब्रेंडन डॉगेट


ब्रेंडन डॉगेटचा दुसऱ्यांदा कसोटीत समावेश करण्यात आला आहे. याआधी 2018 मध्ये तो पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी यूएईला गेला होता. 32 वर्षीय डॉगेटने आतापर्यंत 40 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये एकूण 142 विकेट घेतल्या आहेत. या यादीत त्याच्या नावावर 23 विकेट्स आहेत.


प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणे कठीण


दुसऱ्या कसोटीसाठी ब्रेंडन डॉगेट आणि शॉन ॲबॉट यांचा ऑस्ट्रेलियन संघात समावेश करण्यात आला असला तरी या दोघांनाही प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणे कठीण आहे. कारण ऑस्ट्रेलियाकडे आधीच स्कॉट बोलँड आहे. कर्णधार पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करताना दिसणार आहे. त्याला साथ देण्यासाठी मिचेल स्टार्क संघात आहे.


हे ही वाचा -


Mohammed Shami : टीम इंडियाचा वाघ पुन्हा एकदा जखमी! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये खेळण्याच्या आशा मावळल्या? फोटो व्हायरल


Ind vs Aus 2nd Test : ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का