IND vs AUS LIVE Final 2023 : ऑस्ट्रेलियाचा भारतावर सहा विकेटने विजय, भारताच्या पदरी निराशा

IND vs AUS LIVE Final 2023: रोहित शर्माची (Rohit Sharma) टीम इंडिया (Team India) वि. पॅट कमिन्सची ऑस्ट्रेलियन टीम विश्वचषकाच्या (World Cup Final) फायनलमध्ये आहेत. विश्चषकाच्या फायनलकडे जगाचं लक्ष आहे.

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 19 Nov 2023 09:21 PM
ऑस्ट्रेलियाचा भारतावर सहा विकेटने विजय

ऑस्ट्रेलियाचा भारतावर सहा विकेटने विजय, भारताच्या पदरी निराशा

अखेर ट्रेविस हेड बाद

मोहम्मद सिराजच्या चेंडूवर ट्रेविस हेड बाद झाला. 

लाबुशेनचं अर्धशतक

मार्नस लाबुशेनचं संयमी अर्धशतक... ऑस्ट्रेलिया विजयाच्या समीप

ट्रेविस हेडचे झंझावती शतक

ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाज ट्रेविस हेड याने 95 चेंडूत झंझावती शतक ठोकले. ऑस्ट्रेलिया 3 बाद 185 धावा... 

भारताच्या हातून सामना सुटताना

हेडमुळे टीम इंडियाच्या डोक्याला ताप झालाय. ऑस्ट्रेलियाने विजयाकडे वाटचाल केली. हेड शतकाजवळ पोहचलाय

पंतप्रधान मोदी स्टेडियमवर दाखल

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना पाहण्यासाठी नरेंद्र मोदी दाखल झालेत. 





ट्रेविस हेड-लाबुशेनची जोडी धोकादायक

ट्रेविस हेड आणि लाबुशन यांची भागिदारी धोकादायक ठरत आहे. दोघांनीही विकेटवर फाय रोवले आहेत. हेड 69 तर लाबुशेन 33 धावांवर खेळत आहे. जोडी फोडण्याचे टीम इंडियाच्या गोलंदाजाकडे कडवे आव्हान

IND vs AUS LIVE Final 2023 : ट्रेविस हेडचं अर्धशतक

भारताने दिलेल्या 241 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ट्रेविस हेडने अर्धशतक ठोकले. हेडने लाबुशेनला साथीला घेत भागिदारी रचली. हेड 58 चेंडूत 50 धावा काढून खेळत आहे.

IND vs AUS LIVE Final 2023 : पॉवरप्ले संपला, सामना रोमांचक स्थितीत

241 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने वादळी सुरुवात केली. पण मोहम्मद शामी आणि बुमराह यांनी विकेट घेतल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला लगाम लागला. दहा षटकानंतर ऑस्ट्रेलियाने 3 बाद 60 धावा केल्या आहेत. ट्रेविस हेड आणि मार्नस लाबुशेन मैदानावर आहेत.

IND vs AUS LIVE Final 2023 : ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का

स्टिव्ह स्मिथला बाद करत बुमराहने ऑस्ट्रेलियाला दिला तिसरा धक्का.... स्मिथ चार धावा काढून बाद झाला. ऑस्ट्रेलिया 3 बाद 47 धावा

IND vs AUS LIVE Final 2023 :ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का

जसप्रीत बुमराहने मिचेल मार्शला बाद ऑस्ट्रेलियाला दिला दुसरा धक्का. मिचेल मार्श 15 चेंडूत 15 धावा काढून बाद झाला. यामध्ये एक चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. ऑस्ट्रेलिया 2 बाद 41 धावा

3 षटकानंतर ऑस्ट्रेलियाची आक्रमक सुरुवात

3 षटकानंतर ऑस्ट्रेलियाची आक्रमक सुरुवात केली. वॉर्नर परतल्यानंतर ट्रेविस हेड आणि मिचेल मार्श यांनी मोर्चा संभाळला. ऑस्ट्रेलिया एक बाद 30 धावा

IND vs AUS LIVE Final 2023 : भाराताला पहिले यश

मोहम्मद शामीने डेविड वॉर्नरला पाठवले तंबूत.. भारताला पहिले यश मिळाले आहे. शामीच्या गोलंदाजीवर विराटकडे झेल देऊन वॉर्नर बाद झालाय. ऑस्ट्रेलिया एक बाद 16 धावा

IND vs AUS LIVE Final 2023 : पहिल्याच षटकात 15 धावा वसूल

डेविड वॉर्नर आणि ट्रेविस यांनी आक्रमक सुरुवात केली. बुमराहच्या पहिल्याच षटकात ऑसीच्या सलामी फलंदाजांनी 15 धावा वसूल केल्या. वॉर्नरने 7 तर हेडने 8 धावा चोपल्या. 

IND vs AUS LIVE Final 2023 : ऑस्ट्रेलियाची शानदार सुरुवात

वॉर्नर आणि ट्रेविस हेड यांनी बुमराहच्या गोलंदाजीवर हल्लाबोल करत शानदार सुरुवात केली. दोन चेंडूत सात धावा वसूल केल्या.

विराट-राहुलची संयमी अर्धशतकं, भारताचे कांगारुसमोर 241 धावांचे माफक आव्हान

विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर भारताने निर्धारित 50 षटकात 240 धावांपर्यंत मजल मारली. विराट कोहलीने 54 तर राहुलने 66 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क याने तीन तर हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 241 धावांचे माफक आव्हान मिळाले आहे. 

IND vs AUS LIVE Final 2023 : भारताला नववा धक्का, सूर्या बाद

सूर्यकुमार यादवच्या रुपाने भारताला नववा धक्का बसलाय. मोठा फटका मारण्याच्या नादात सूर्यकुमार यादव बाद झालाय. सूर्यकुमार यादव 18 धावांवर बाद झालाय. 

IND vs AUS LIVE Final 2023 :भारताला आठवा धक्का

भारतीय फलंदाजांची हरिकारी सुरु आहे. एकापोठापाठ एक विकेट फेकल्या जात आहे. केएल राहुल, शामीनंतर आता जसप्रीत बुमराह बाद झाला. बुमराहाला फक्त एक धाव काढता आली.

IND vs AUS LIVE Final 2023 : भारताचा हर्ट ब्रेक, लागोपाठ दोन विकेट गेल्या, शामीही तंबूत

केएल राहुल अर्धशतकानंतर तंबूत परतला. त्या धक्क्यातून सावरत नाही, तोच मोहम्मद शामीही बाद झाला. 

भारताला सहावा तगडा झटका; केएल राहुल बाद

केएल राहुल बाद झाल्याने सूर्यकुमार यादव शेवटची आशा आहे. कसा तरी स्कोअर 270 च्या जवळ न्यावा लागेल. मात्र, खेळपट्टी संथ आहे. ही खेळपट्टी 350 नाही. रोहित काल PC मध्ये देखील म्हणाला होता की खेळपट्टी खूप संथ वाटत होती. 40 षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या पाच विकेटवर 197 धावा आहे.

IND vs AUS LIVE Final 2023: भारताचे द्विशतक

राहुलच्या संयमी खेळीच्या बळावर भारताने द्विशतक फलकावर लागलेय. केएल राहुल आणि सूर्या मैदानावर आहेत. अखेरच्या 9 षटकाची फलंदाजी शिल्लक आहे.

IND vs AUS LIVE Final 2023: सूर्या-राहुलवर भारताची मदार

टीम इंडियाने 37.4 षटकानंतर 5 बाद 181 धावा केल्या आहेत. सर्व मदार केएल राहुल आणि सूर्यावर आहे. 

IND vs AUS LIVE Final 2023: भारताला पाचवा धक्का

हेजलवूडने दिला भारताला पाचवा धक्का.... रविंद्र जाडेजा 9 धावांवर तंबूत परतला...

IND vs AUS LIVE Final 2023: केएलचं अर्धशतक

केएल राहुलनं संयमी अर्धशतक ठोकले. 85 चेंडूमध्ये राहुलने अर्धशतक ठोकले.. भारत 4 बाद 173 धावा

IND vs AUS LIVE Final 2023: ऑस्ट्रेलियाची जबरा फिल्डिंग

अहमदाबादमध्ये सुरु असलेल्या फायनलमध्ये ऑसी संघाच्या खेळाडूंनी चांगली फिल्डिंग केली. एकापेक्षा एक अप्रतिम फिल्डिंग करत धावा रोखल्या. 

IND vs AUS LIVE Final 2023: भारताला मोठा धक्का, विराट कोहली बाद

अर्धशतकानंतर विराट कोहली बाद झालाय. विराट कोहली 63 चेंडूत 54 धावा काढून बाद झाला. पॅट कमिन्सच्या चेंडूवर विराट कोहली बाद झालाय. 148 धावांवर भारताला चौथा धक्का

IND vs AUS LIVE Final 2023:  15 षटकांपासून चौकार-षटकार नाहीच

 


अय्यर आणि रोहित बाद झाल्यानंतर भारतीय संघाची फलंदाजी संथ झाली आहे. मागील 15 षटकांपासून टीम इंडियाला एकही चौकार अथवा षटकार मारता आला नाही. ऑस्ट्रेलियाच्या फिल्डर्सनी शानदार फिल्डिंग केली आहे.

IND vs AUS LIVE Final 2023: विराट कोहलीचं अर्धशतक

विश्वचषकाच्या फायनलसामन्यात विराट कोहलीने अर्धशतक ठोकले. विराट कोहलीने 56 चेंडूत अर्धशतक केले.  उपांत्य सामन्यात विराट कोहलीने शतक ठोकले होते. 





IND vs AUS LIVE Final 2023: भारताचे शतक फलकावर

भारतीय संघाचे शतक फलकावर लागलेय. विराट 34 तर राहुल 10 धावांवर खेळत आहे. भारत 3 बाद 100 धावा..... 

IND vs AUS LIVE Final 2023: विराट कोहली-केएल राहुल मैदानात

 तीन विकेट गेल्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल पुन्हा एकदा मैदानावर स्थिरावलेत. भारतीय संघाची धावसंख्या वाढवण्याचे काम या जोडीवरच असेल. भारतीय संघ तीन बाद  95 धावा.... विराट 31 तर राहुल 8 धावांवर खेळत आहेत. 

IND vs AUS LIVE Final 2023: भारताची फलंदाजी ढेपाळली

रोहितपाठोपाठ श्रेयस अय्यरही माघारी परतला. भारताला तिसरा धक्का बसलाय. फॉर्मात असलेला अय्यर स्वस्तात माघारी परतलाय. अय्यरला फक्त चार धावा काढता आल्या. भारत तीन बाद 81 धावा

IND vs AUS LIVE Final 2023: भारताला दुसरा धक्का

रोहित शर्माच्या रुपाने भारताला दुसरा धक्का बसलाय. रोहित शर्मा 47 धावा काढून बाद झाला. ग्लेन मॅक्सवेलच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात रोहित शर्मा बाद झालाय. भारत 2 बाद 76 धावा

IND vs AUS Final 2023 LIVE : विराट कोहलीचा सलग तिसरा चौकार

विराट कोहलीने मिचेल स्टार्कला लागोपाठ तीन चौकार लगावले.  भारताचे अर्धशतक फलकावर.... रोहित शर्मा 32 तर कोहली 15 धावांवर

शुभमन गिल बाद

भारताला पहिला धक्का बसलाय. शुभमन गिल फक्त चार धावा काढून बाद झाला. भारतीय संघ एक बाद 30 धावा

IND vs AUS Final 2023 LIVE : रोहितच्या बॅटमधून पहिला षटकार

रोहित शर्माने हेजलवूडला लगावला षटकार....  रोहित-गिलची शानदार सुरुवात

रोहित-गिलची सुरुवात

रोहित-गिलची सुरुवात झाली आहे. स्टार्क गोलंदाजीला तयार

IND vs AUS Final 2023 LIVE : विराट कोहलीला सचिनकडून मोठं गिफ्ट

सचिन तेंडुलकरने विराट कोहलीला जर्सी भेट दिली. फोटो व्हायरल झालाय. 





IND vs AUS Final 2023 LIVE : अनुष्का, आथिया स्टेडियममध्ये दाखल

IND vs AUS Final 2023 LIVE : भारताकडून कुणी झळकावली शतके? अर्धशतके

 नाव                  शतके/अर्धशतके

विराट कोहली      ०३/०५
श्रेयस अय्यर       ०२/०३
केएल राहुल  - ०१/०१
रोहित शर्मा   ०१/०३

IND vs AUS Final 2023 LIVE : ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाची कामगिरी

 नाव                सामने   विकेट    सरासरी


अॅडम झॅम्पा     १०     २२      २१.४०
जॉश हेजलवूड   १०    १४     २७.७८
मिचेल स्टार्क     ०९     १३     ३६.३८
पॅट कमिन्स       १०     १३       ३७.००
ग्लेन मॅक्सवेल     ०७    ०५     ५९.००
मार्कस स्टॉयनिस  ०६   ०४     ३५.७५


 
IND vs AUS Final 2023 LIVE : भारताच्या टॉप 5 फलंदाजाची विश्वचषकातील कामगिरी

खेळाडू -        डाव  - धावा  - सरासरी -

विराट कोहली   १० - ७११  - १०१.५७
रोहित शर्मा - १० - ५५० - ५५.००
श्रेयस अय्यर - १० - ५२६ - ७५.१४
केएल राहुल - ०९ - ३८६ - ७७.२०
शुभमन गिल - ०८ - ३४६ -  ४९.४२

IND vs AUS Final 2023 LIVE : सामन्याआधी हवाई दलाचा एअर शो

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्याआधी हवाई दलाचा एअर शो सुरु आहे.

ऑस्ट्रेलिया प्लेईंग इलेव्हन : Australia playing XI

डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा आणि जोश हेझलवुड.

टीम इंडियाचे शिलेदार : Team India playing XI

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

IND vs AUS Final 2023 LIVE: टीम इंडियामध्ये कोणताही बदल नाही

फायनल सामन्यासाठी टीम इंडियात कोणताही बदल करण्यात आला नाही. मागील सामन्यातील संघ मैदानात उतरवलाय

IND vs AUS Final 2023 LIVE: ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

IND vs AUS Final 2023 LIVE: अण्णा हजारेंनी दिल्या भारतीय संघाला शुभेच्छा

भारत ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या अंतिम सामन्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भारतीय संघाला दिल्या शुभेच्छा आहेत क्रिकेट या खेळाकडून देशातील तरुण मोठी प्रेरणा घेतात भारतीय संघ जिंकला तर अनेक तरुणांना प्रेरणा मिळणार अहमदाबाद येथे होत असलेला क्रिकेटचा अंतिम  सामना भारत जिंकावा यासाठी अण्णांनी केली देवाकडे  प्रार्थना करणार असल्याचं अण्णा म्हणाले आहेत यासोबतच हा महत्त्वपूर्ण असलेला सामना आपण देखील बघणार असल्याचे अण्णा म्हणाले आहेत.

IND vs AUS Final 2023 LIVE: थोड्याच वेळात होणार नाणेफेक
IND vs AUS Final 2023 LIVE: नरेंद्र मोदी स्टेडियमवर चाहत्यांचा महापूर

IND vs AUS Final 2023 LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदी फायनल पाहण्यासाठी येणार

भारत-आॅस्ट्रेलिया अंतिम सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल होणार आहेत. अशात, अनेक नरेंद्र मोदींचे चाहते देखील या परिसरात दाखल होत असल्याचं चित्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मोठं पोस्टर घेत मोदी मोदींचे नारे सध्या स्टेडियम बाहेर ऐकायला मिळत आहेत. क्रिकेट रसिकांसोबतच राजकीय नेत्यांचे चाहते देखील परिसरात दाखल होत आहेत.

IND vs AUS Final 2023 LIVE: दिग्गज सामना पाहण्यासाठी येणार


भारत-आॅस्ट्रेलिया अंतिम सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल होणार आहेत. अशात, अनेक नरेंद्र मोदींचे चाहते देखील या परिसरात दाखल होत असल्याचं चित्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मोठं पोस्टर घेत मोदी मोदींचे नारे सध्या स्टेडियम बाहेर ऐकायला मिळत आहेत. क्रिकेट रसिकांसोबतच राजकीय नेत्यांचे चाहते देखील परिसरात दाखल होत आहेत. 

IND vs AUS Final 2023 LIVE: मोदींकडून टीम इंडियाला शुभेच्छा, म्हणाले...

ऑल द बेस्ट टीम इंडिया!
140 कोटी भारतीय तुमच्या पाठिशी आहेत.
चांगलं खेळा, चमक दाखवा, खिलाडूवृत्तीची भावना कायम ठेवा!

IND vs AUS Final 2023 LIVE: नरेंद्र मोदींकडून टीम इंडियाला शुभेच्छा

IND vs AUS Final 2023 LIVE:  नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाला विश्वचषकाच्या फायनल सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ट्वीटरद्वारे मोदींनी शुभेच्छा दिल्यात. 

IND vs AUS Final 2023 LIVE: विश्वचषकात शामीची आग ओखणारी गोलंदाजी -

 


यंदाच्या विश्वचषकात शामी आग ओखणारी गोलंदाजी करतोय.त्याने फक्त 6 सामन्यात 23 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. यादरम्यान त्याने 9.13 च्या शानदार गोलंदाजी सरासरीने आणि 10.91 च्या स्ट्राईक रेटने गोलंदाजी केली. म्हणजेच, प्रत्येक 10 धावानंतर आणि 11 व्या चेंडूनंतर शामी विकेट घेतोय. विश्वचषकाच्या फायनलमध्येही शामी आग ओखणारी गोलंदाजी करेल आणि टीम इंडियाच्या विजयात मोलाची भूमिका बजावेल. 

सचिन तेंडुलकर अहमदाबादेत दाखल

भारतीय संघ विश्वचषक उंचावणार... असा विश्वास सचिन तेंडुलकरने व्यक्त केलाय.

भारतीय संघ स्टेडियमकडे रवाना

थोड्याच वेळात भारतीय संघ नरेंद्र मोदी स्टेडियमवर पोहचणार आहे. हॉटेल नर्मादावरुन टीम इंडिया रवाना झाली आहे.

मैदानाबाहेर गर्दी

मैदानाबाहेर चाहत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी 





भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये लढत

India vs Australia World Cup Final 2023 : वीस वर्षांनी पुन्हा एकदा भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत निर्णायक लढाई होणार आहे. 2003 साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषकात रिकी पॉन्टिंगच्या ऑस्ट्रेलियानं सौरव गांगुलीच्या टीम इंडियाचा फायनलमध्ये धुव्वा उडवला होता. त्यानंतर दोन्ही संघ पुन्हा एकदा विश्वचषकाच्या फायनलच्या रणांगणात आमनेसामने येतायत. रोहित शर्माची फौज विश्वचषकावर भारताचं नाव तिसऱ्यांदा कोरणार का...? की, पॅट कमिन्स अँड कंपनी ऑस्ट्रेलियाला सहाव्यांदा विश्वचषक जिंकून देणार... या प्रश्नाचं उत्तर रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मिळणारय..विश्वचषकात भारताने सलग 10 सामन्यात विजय मिळवलाय. गोलंदाजी, फलंदाजी आणि फिल्डिंगमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंना सर्वस्वी योगदान दिले. सांघिक खेळाच्या बळावर टीम इंडियाने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी धावांचा पाऊस पाडला तर गोलंदाजी सिराज, बुमराह आणि शामी यांनी कमाल केली. त्याशिवाय अय्यर, राहुल, कुलदीप आणि जाडेजा यांचेही मोलाचे योगदान आहे. 

हेड टू हेड रेकॉर्ड (IND vs AUS Head to Head)

भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 150 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाचं पारड जड आहे. ऑस्ट्रेलियाला सर्वाधिक विजय मिळाले आहेत. कांगारूने एकूण 83 सामने जिंकले आहेत, तर भारतीय संघाने 57 विजय मिळवले आहेत. उर्वरित सामने अनिर्णित राहिले. बरं, दोन्ही संघांमधील गेल्या 5 सामन्यांवर नजर टाकली तर भारतीय संघानेच वर्चस्व गाजवले आहे. टीम इंडियाने तीन सामने जिंकले आहेत. आजचा अंतिम सामना ज्या मैदानावर होणार आहे, त्या मैदानावर हे दोन्ही संघ यापूर्वी तीनदा भिडले आहेत. येथेही टीम इंडियाने दोन सामने जिंकले आहेत.

खेळपट्टी कशी असेल? (Narendra Modi Stadium Pitch Report)

 


अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक आहे. या विश्वचषकाचे चार सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आले आहेत. यामध्ये तीन वेळा धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला सहज विजय मिळाला. यासोबतच प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानेही विजयाची नोंद केली आहे. अशा स्थितीत येथे धावांचा पाठलाग सोपा होणे अपेक्षित आहे. त्यामुळे नाणेफेक महत्त्वाची ठरू शकते. मात्र, दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेक फार महत्त्वाची मानत नाहीत.

टीम इंडिया संभाव्य प्लेईंग इलेव्हन : Team India Probable playing XI

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

IND vs AUS Final 2023 LIVE: भारतीय संघाचा विश्वचषकातील प्रवास -

8 ऑक्टोबर - 









11 ऑक्टोबर - 


दिल्लीच्या मैदानात टीम इंडियाने अफगाण संघाचा धुव्वा उडवला. अफगाणिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना 272 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरदाखल टीम इंडियाने हे आव्हान आठ विकेट्स राखून सहज पार केले. रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह या विजयाचे हिरो ठरले. 


14 ऑक्टोबर - 


अहमदाबाद येथील हायव्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा सात विकेट्सने पराभव केला. पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना 191 धावांपर्यंत मजल मारली. बाबर आझम याने अर्धशतकी खेळी केली. पाकिस्तानची सुरुवात अतिशय चांगली झाली होती. पण त्यानंतर फलंदाजी ढेपाळली. भारताने पाकिस्तानचे हे आव्हान तीन विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले. 


19 ऑक्टोबर - 


पुण्यात बांगलादेशचा सात विकेट्सने पराभव करत भारताने विश्वचषकात विजयी चौकार मारला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 256 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरदाखल भारताने हे आव्हान तीन विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. विराट कोहलीने नाबाद शतक झळकावले. 


22 ऑक्टोबर - 


भारताने तब्बल 20 वर्षांनंतर विश्वचषकाच्या मैदानात न्यूझीलंडचा पराभव केला. धरमशालाच्या मैदानात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 273 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरदाखल भारताने हे आव्हान चार विकेट्स राखून सहज पार केले. विराट कोहलीने शानदार अर्धशतक ठोकले. मोहम्मद शामीने पाच विकेट्स घेतल्या. 


29 ऑक्टोबर - 


गतविजेत्या इंग्लंडचा 100 धावांनी पराभव करत भारताने विजयाचा षटकार मारला. लखनौच्या मैदानात प्रथम फलंदाजी करताना भारताने फक्त 229 धावांपर्यंत मजल मारली. पण भारताच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत या माफक आव्हानाचा बचाव केला. इंग्लंडचा संपूर्ण संघ 129 धावांत संपुष्टात आला. मोहम्मद शामीने चार विकेट्स घेतल्या. रोहित शर्माने संयमी अर्धशतक ठोकले. 


2 नोव्हेंबर - 


वानखेडेच्या मैदानात भारताने श्रीलंकेला पराभवाचा जोरदार धक्का दिला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 357 धावांचा डोंगर उभरला. विराट कोहली, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी अर्धशतके ठोकली. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना लंकेच्या फलंदाजांन सपशेल नांगी टाकली. सिराज, बुमराह आणि शामीच्या माऱ्यापुढे श्रीलंकेच्या फलंदाजांनी लोटांगण घातले.


5 नोव्हेंबर - 


कोलकात्याच्या मैदानावर भारताने दक्षिण आफ्रिकेचा तब्बल 243 धावांनी पराभव केला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 326 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरदाखल आफ्रिकेचा संघ फक्त 83 धावांवर गार झाला. 


12 नोव्हेंबर - 


साखळीच्या अखेरच्या सामन्यात भारताने 160 धावांनी विजय मिळवला. नेदरलँड्सविरोधात भारताने प्रथम फलंदाजी करताना 410 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरदाखल नेदरलँड्सचा संघ 250 धावांपर्यंत मजल मारु शकला. 


15 नोव्हेंबर - 


वानखेडे मैदानावर उपांत्य सामन्यात भारत आणि न्यूझीलंड संघ आमने सामने आले होते. हा सामना भारताने 70 धावांनी जिंकला. भारताने प्रथम फंलदाजी करताना 397 धावांपर्यंत मजल मारली. विराट कोहली आणि अय्यर यांनी शानदार शतके ठोकली होती. प्रत्युत्तरदाखल न्यूझीलंडच्या संघाने 327 धावांपर्यंत मजल मारत तगडी फाईट दिली. मोहम्मद शामीने सात विकेट घेतल्या. 

ऑस्ट्रेलिया संभाव्य प्लेईंग इलेव्हन : Australia Probable playing XI

डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा आणि जोश हेझलवुड.

कोण जिंकणार ?

ऑस्ट्रेलियानं आजवरच्या इतिहासात... 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 मध्ये विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. त्यापैकी 2003 साली पॉण्टिंगच्या ऑस्ट्रेलियानं सौरव गांगुलीच्या टीम इंडियाचा धुव्वा उडवून विश्वचषकाचा मान मिळवला होता. त्यानंतर वीस वर्षांनी पुन्हा एकदा विश्वचषकाच्या महायुद्धात भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या फौजा निर्णायक लढाईसाठी पुन्हा आमनेसामने येतायत. वीस वर्षांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं चित्र तब्बल 360 अंशांनी बदललंय. भारत ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटची आर्थिक महासत्ता आधीपासूनच होतीच. पण सध्या भारत ही वन डे क्रिकेटचीही जणू महासत्ता भासतेय...

नमस्कार!

एबीपी माझावर तुमचं स्वागत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणाऱ्या विश्वचषकाच्या रनसंग्रामाचं लाईव्ह अपडेट तुम्हाला येथे मिळेल. सर्व माहिती जाणून घेण्यासाठी लाईव्ह ब्लॉक फॉलो करा... 

पार्श्वभूमी

IND vs AUS World Cup 2023 Final LIVE Score: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) भारतीय संघ तब्बल वीस वर्षांनंतर सौरव गांगुलीच्या (sourav ganguly) टीम इंडियाच्या (Team India)  पराभवाचा बदला घेणार का?... हा प्रश्न विचारण्याचं कारण विश्वचषकाच्या महायुद्धात  (World Cup Final) वीस वर्षांनी पुन्हा एकदा भारत आणि ऑस्ट्रेलिया ( India vs Australia) संघांत निर्णायक लढाई होणार आहे. 2003 साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषकात रिकी पॉन्टिंगच्या ऑस्ट्रेलियानं सौरव गांगुलीच्या टीम इंडियाचा फायनलमध्ये धुव्वा उडवला होता. त्यानंतर दोन्ही संघ पुन्हा एकदा विश्वचषकाच्या फायनलच्या (World Cup 2023 Final) रणांगणात आमनेसामने येतायत. त्यामुळं प्रश्न विचारण्यात येतोय की, रोहित शर्माच्या (Rohit Sharma)  भारतीय संघ तब्बल वीस वर्षांनी सौरव गांगुलीच्या (sourav ganguly) टीम इंडियाच्या पराभवाचा बदला घेणार का? 1983, 2011 आणि आता 2023.... रोहित शर्माची (Rohit Sharma)  फौज विश्वचषकावर भारताचं नाव तिसऱ्यांदा कोरणार का...? की, पॅट कमिन्स अँड कंपनी ऑस्ट्रेलियाला सहाव्यांदा विश्वचषक जिंकून देणार... या प्रश्नाचं उत्तर रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर  (Narendra Modi Stadium, Ahmedabad)  मिळणारय..


ऑस्ट्रेलियानं आजवरच्या इतिहासात... 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 मध्ये विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. त्यापैकी 2003 साली पॉण्टिंगच्या ऑस्ट्रेलियानं सौरव गांगुलीच्या टीम इंडियाचा धुव्वा उडवून विश्वचषकाचा मान मिळवला होता. त्यानंतर वीस वर्षांनी पुन्हा एकदा विश्वचषकाच्या महायुद्धात भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या फौजा निर्णायक लढाईसाठी पुन्हा आमनेसामने येतायत. वीस वर्षांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं चित्र तब्बल 360 अंशांनी बदललंय. भारत ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटची आर्थिक महासत्ता आधीपासूनच होतीच. पण सध्या भारत ही वन डे क्रिकेटचीही जणू महासत्ता भासतेय...


विश्वचषकाच्या साखळीत भारतानं नऊपैकी नऊ सामने जिंकण्याचा पराक्रम गाजवला. पण ऑस्ट्रेलियाला नऊपैकी सात सामन्यांमध्येच विजय मिळवता आला. ऑस्ट्रेलियाला भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघांकडून साखळीत हार स्वीकारण्याची वेळ आली. त्यापैकी भारतानं ऑस्ट्रेलियाचा अख्खा डाव 199 धावांत गुंडाळून सहा विकेट्सनी विजयी सलामी दिली. त्यानंतरही भारतीय शिलेदारांनी सातत्यानं कामगिरी बजावून विश्वचषकावर आपल्या निर्विवाद वर्चस्वाचा ठसा उमटवला...


कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुलनं विश्वचषकात सातत्यानं धावांचा रतीब घातलाय जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, रवींद्र जाडेजा आणि कुलदीप यादवच्या आक्रमणासमोर दहाही सामन्यांमध्ये प्रतिस्पर्ध्यांनी सपशेल लोटांगण घातलं. नाही म्हणायला न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात  भारताच्या क्षेत्ररक्षणाला गालबोट लागलं, पण भारताच्या सुदैवानं मोहम्मद शमीनं कमालीचं आक्रमण करून किवी फलंदाजीचं कंबरडं मोडलं. त्यामुळंच रोहितसेनेला विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारता आली. ऑस्ट्रेलियाच्याही डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्नस लाबूशेन आणि स्टीव्ह स्मिथ या फलंदाजांच्या कामगिरीत कमालीचं सातत्यय. तसंच अॅडम झॅम्पा, जॉश हेझलवूड, मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सनं गोलंदाजीत आपली कामगिरी चोख बजावलीय...








- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.