IND Vs AUS : साऊथ ऑस्ट्रेलियात कोरोनाचा प्रादुर्भाव अचानक वाढल्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया समोर अनेक समस्या उभ्या आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही भारतासोबतच्या मालिकेआधी अनेक खेळाडूंना न्यू साऊथ वेल्समध्ये हलवलं आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ज्या खेळाडूंना चार्टर फ्लाइटने दुसऱ्या ठिकाणी पाठवलं आहे, त्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार टिम पेन, मार्नस लाबुशैन, मेथ्यू वेड आणि ट्रेविस हेड यांचा समावेश आहे.


भारता विरुद्धची महत्त्वाची मालिका सुरळीत पार पडण्यासाठी सीएने यजमान संघातील खेळाडूंना न्यू साऊथ वेल्स येथे हलविण्याची योजना आखली आहे. मर्यादित षटकांच्या सामन्यात खेळणाऱ्या खेळाडूंव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया अ संघाकडून खेळणाऱ्या खेळाडूंना न्यू साऊथवेल्स मार्गे सिडनीला हलवणार आहे.


साऊथ ऑस्ट्रेलियाने रविवारी सांगितले होते की, ऑस्ट्रेलियात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच सोमवारी कोरोनाची रुग्णसंख्या 17 पर्यंत पोहोचली होती. दरम्यान, मंगळवारी ही संख्या कमी होऊन पाचवर आली आहे.'


वेस्टर्न आस्ट्रेलिया, तस्मानिया आणि द नॉर्थन टॅरीटरीच्या प्रशासनाने शहरांच्या सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच स्कॉटलँडने एडिलेडमधून येणाऱ्या लोकांना दोन आठवड्यांसाठी क्वॉरंटाईन ठेवण्यात येणार असल्याचा आदेश जारी केला आहे.


पाहा व्हिडीओ : India vs Australia दौऱ्यावर कोरोनाचं सावट; खेळाडूंना न्यू साऊथ वेल्सला स्थलांतरित करण्याची योजना



ठरलेल्या वेळीच होणार ऑस्ट्रेलिया-भारत मालिका


वेस्टर्न आस्ट्रेलिया, तस्मानिया आणि द नॉर्थन टॅरीटरीच्या प्रशासनाने शहरांच्या सीमा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सीए आणि बीबीएल क्लबने आपल्या खेळाडूंच्या सुरक्षेसाठी चार्टर विमानाने त्यांना जिथे सामान खेळवण्यात येणार आहे, त्याठिकाणी पोहोचवण्याचा निर्णय घेण्यात आला.


भारतासोबत खेळवण्यात येणारी महत्त्वपूर्ण सीरिजबाबत सीए पूर्ण खबरदारी घेत आहे. एडिलेडमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. असं असलं तरिही सीएला विश्वास आहे की, दोन्ही संघांमध्ये एडिलेड ओवलमध्ये खेळवण्यात येणाऱ्या आतापर्यंतच्या पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यांना स्थलांतरित करण्याची गरज भासणार नाही.


दरम्यान, ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार आयोजक, खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांना हवाई मार्गाने आणण्याची योजना आहे. जैव सुरक्षा पथक आणि संचालन समितीची परिस्थितीवर नजर आहे. आगामी सत्रात खेळाडू, कोचेस आणि सपोर्ट स्टाफमधील कुणालाही कोरोनाची बाधा होऊ नये,यासाठी युद्धस्तरावर काम सुरू असल्याची माहिती सीएने दिली आहे.


महत्त्वाच्या बातम्या :