सिडनी : ब्रिजबेनच्या गाबा मैदानात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या जोडीने इतिहास रचला आहे. शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी कठीण परिस्थितीत शतकी भागीदारी करत टीम इंडियाचा डाव सावरला. ऑस्ट्रेलियामधील सातव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करणारे हे दोघे चौथे भारतीय ठरले. तिसऱ्या दिवशी लंचनंतर 186 धावांवर भारताची सहावी विकेट गमावली तेव्हा शार्दुल आणि सुंदरने खेळण्यास सुरवात झाली. शार्दुल ठाकूरने आपल्या कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले.


ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 369 धावा केल्या होत्या आणि त्यानंतर भारत पिछाडीवर दिसत होता. पण त्यानंतर या दोघांनीही 180 चेंडूत 100 धावांची भर घालून भारताचा डाव काहीस सावरला. जानेवारी 2019 नंतर सातव्या विकेटसाठी भारताची ही पहिली शतकी भागीदारी आहे. याआधी 2018-19 मध्ये ऋषभ पंत आणि रवींद्र जाडेजा यांनी सिडनीमध्ये 204 धावांची भागीदारी केली होती.





ऑस्ट्रेलियामधील सातव्या विकेटसाठी शतकी भागीदारीचा याआधीचा विक्रम बराच जुना आहे. 1947 -48 मध्ये स्वतंत्र मिळाल्यानंतर भारतीय टीम प्रथमच विदेशी दौ्ऱ्यावर होती. त्यावेळी विजय हजारे आणि हेमू अधिकाी यांनी एडिलेडमध्ये 132 धावांची भागीदारी केली होती. तेव्हा भारतीय संघ पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर गेला होता. या व्यतिरिक्त मोहम्मद अझरुद्दीन आणि मनोज प्रभाकर यांनी 1991-92 च्या मालिकेत सातव्या विकेटसाठी 101 धावांची भागीदारी केली.


भारतीय संघात पदार्पण करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरच्या नावामागची गोष्ट


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. ऑस्ट्रेलियाने एडिलेड कसोटी जिंकली होती, तर भारत मेलबर्न कसोटी जिंकून बरोबरी करण्यात यशस्वी झाला. सिडनी कसोटी अनिर्णित होती, त्यामुळे मालिकेचा निर्णय ब्रिस्बेन कसोटीवर अवलंबून आहे.


संबंधित बातम्या