India vs Australia 4th Test: गाबा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाबरोबर सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी बाद झाल्यानंतर भारतीय सलामीवीर रोहित शर्मा लंगडत मैदानाच्या बाहेर पडला. यानंतर आता रोहितही जखमी झाला आहे का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. अद्याप याची अधिकृत घोषणा झालेली नाही.


रोहितने 74 चेंडूंत सहा चौकारांच्या मदतीने 44 धावा केल्या. नाथन ल्योनच्या चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. बाद झाल्यानंतर तो लंगडत पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याच्याकडे पाहिल्यानंतर त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली असल्याचे जाणवत होते.


IND Vs AUS 4th Score Updates | पावसामुळं दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला; जाणून घ्या भारताची आतापर्यंतची धावसंख्या


यापूर्वी याच कसोटीत नवदीप सैनीही जखमी झाला होता. या मालिकेत जखमी झालेला तो भारताचा आठवा खेळाडू होता. या कसोटीत त्याने फक्त 7.5 षटके फेकली. त्याच्या आधी जसप्रीत बुमराह, आर अश्विन, केएल राहुल, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, नवदीप सैनी, उमेश यादव आणि हनुमा विहारी हेदेखील जखमी झाले आहेत.


या मालिकेत जखमी झालेले भारतीय खेळाडू


केएल राहुल (मनगटात दुखापत)


हनुमा विहारी (स्थानूमध्ये तणाव)


रवींद्र जडेजा (अंगठा फ्रॅक्चर)


आर अश्विन (पाठदुखी)


उमेश यादव (पोटरीत इजा)


मोहम्मद शमी (हातातील फ्रॅक्चर)


जसप्रीत बुमराह (पोट दुखापत)


नवदीप सैनी (स्नायूंमध्ये तणाव)