Border Gavaskar Trophy 2023: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 (Border–Gavaskar Trophy 2023) चा पहिला कसोटी सामना (Test Cricket) नागपुरात खेळवण्यात आला. या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा (IND vs AUS) एक डाव आणि 132 धावांनी पराभव केला. आता 17 फेब्रुवारीपासून दिल्लीत दुसरा कसोटी सामना सुरू होणार आहे. या सामन्यात भारताचा पराभव करून मालिकेत बरोबरी साधेल, असा दावा ऑस्ट्रेलियन संघाकडून केला जात आहे. परंतु, प्रत्यक्ष आकडेवारी मात्र काहीतरी वेगळंच सांगते. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत दिल्लीत खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचं पारडं नेहमीच जड राहिलं आहे. 


टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दिल्लीत झालेल्या कसोटी सामन्यांबद्दल बोलायचं झालं तर, गेल्या 6 दशकांत ऑस्ट्रेलियाला टीम इंडियाचा पराभव करण्यात आलेला नाही. ऑस्ट्रेलियाला एकदाही दिल्लीत टीम इंडियाचा कसोटी सामन्यांत पराभव करता आलेला नाही. 1959 मध्ये दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा शेवटचा पराभव केला होता. याचाच अर्थ गेल्या 63 वर्षांत ऑस्ट्रेलियन संघाला दिल्लीत एकाही कसोटी सामन्यात टीम इंडियाला हरवता आलेलं नाही. गेल्या 63 वर्षांत दिल्लीच्या खेळपट्टीवर काय घडलं? जाणून घेऊयात सविस्तर...  


गेल्या 63 वर्षांत दिल्लीत खेळवण्यात आलेल्या कसोटीत टीम इंडिया अजिंक्यच 



  • 12 डिसेंबर 1959 : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दिल्लीत कसोटी सामना खेळवण्यात आला होता. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा एक डाव आणि 127 धावांनी पराभव केला होता. मात्र, दिल्लीतील ऑस्ट्रेलियाचा तो शेवटचा विजय ठरला. तेव्हापासून दिल्लीत या दोन संघांमध्ये एकूण 6 कसोटी सामने खेळले गेले, पण कांगारूंना एकदाही टीम इंडियाचा पराभव करता आलेला नाही. 

  • 28 नोव्हेंबर 1969 : दिल्लीत भारतानं ऑस्ट्रेलियाचा 7 विकेट्सनी पराभव केला.

  • 13 ऑक्टोबर 1979 : दिल्लीत खेळलेला भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामना अनिर्णित राहिला.

  • 26 सप्टेंबर 1986 : दिल्लीत खेळलेला हा भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामनाही अनिर्णित राहिला होता.

  • 10 ऑक्टोबर 1996 : दिल्लीत खेळल्या गेलेल्या त्या कसोटी सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा 7 गडी राखून पराभव केला.

  • 29 ऑक्टोबर 2008 : दिल्लीत खेळलेला हा भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामनाही अनिर्णित राहिला.

  • 22 मार्च 2013 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दिल्लीत खेळल्या गेलेल्या या शेवटच्या कसोटी सामन्यात भारताने 6 गडी राखून विजय मिळवला.


आधी गोलंदाजी करुन टीम इंडिया अजिंक्य


टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दिल्लीत खेळवण्यात आलेल्या सामन्यांच्या आकडेवारीत आणखी एक गोष्ट लक्षात घेता येईल की, गेल्या 63 वर्षांत टीम इंडियानं जेव्हाही ऑस्ट्रेलियाला दिल्लीतील कसोटी सामन्यात पराभूत केलं, तेव्हा भारतानं नाणेफेक गमावली होती आणि ऑस्ट्रेलियानं सर्वात आधी फलंदाजी केली होती.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


India vs Australia 2nd Test: सूर्या की अय्यर; कोणाला निवडणार रोहित शर्मा? दिल्ली कसोटीत अशी असू शकते टीम इंडियाची प्लेईंग 11