IND vs AUS 2023 : भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील निर्णायक आणि चौथा कसोटी सामना 9 मार्चपासून सुरु होणार आहे. या मालिकेत टीम इंडियाला ऋषभ पंतची कमी जाणवली आहे. पंत मोक्याच्या क्षणाला येऊन विस्फोटक फलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण करतो. सध्या एकाही फलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही. त्यातच तीन सामन्यात भरतला लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे चाहत्यांकडून ईशान किशन याला प्लेईंग 11 मध्ये स्थान देण्याची मागणी करण्यात येत आहे. संघ व्यवस्थापन यावर विचार करणार का? याबाबत चर्चा सुरु आहे. 


सुत्रांच्या माहितीनुसार, चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात ईशान किशन पदार्पण करु शकतो. रोहित शर्मा ईशानला श्रीकर भरतच्या जागी संधी देऊ शकतो. भरतला तिन्ही सामन्यात लौकिकास साजेशी खेळी करता आलेली नाही. त्याचा टीम इंडियाला फटका बसला.  


ईशानला संघात स्थान मिळण्याची कारणे ?


ईशान किशन डाव्या हाताने फलंदाजी करतो, हाच त्याचा प्लसपॉईंट आहे. अक्षर पटेल आणि जाडेजाचा अपवाद वगळता संघात सध्या डाव्या हाताचा फलंदाज नाही. त्यामुळे ईशान किशनला संघात स्थान देण्याची शक्यता आहे. त्याशिवाय तो आक्रमक फंलदाजी करतो. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाज दबावात येऊ शकतात. ईशान कसोटीतही टी 20 स्टाईल फलंदाजी करु शकतो. 


केएस भरतची कामगिरी -
मागील दोन वर्षांपासून टीम इंडिया केएस भरत याला ऋषभ पंत याचा बॅकअप म्हणून तयार करत होती. पण भरत याला संधीचं सोनं करता आले नाही. तिन्ही कसोटी सामन्यात भरत याला फलंदाजीत प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील पाच डावात भरत याने 8, 6, नाबाद 23, 17 आणि 3 धावा केल्या आहेत. भरत याला पाच डावात फक्त 57 धावा करता आल्या आहेत. फलंदाजीत भरत अपयशी ठरला असला तरी विकेटकिपिंग प्रभावी केली आहे. फिरकीच्या कठीण खेळपट्टीवर भरत याने प्रभावी यष्टीरक्षण केलेय. 


भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, इशान किशन, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सूर्यकुमार यादव, जयदेव उनादकट.


ऑस्ट्रेलियाचा संघ : स्कॉट बोलैंड, एलेक्स केरी, कॅमरुन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, ट्रैविस हेड, उस्मान ख्वाजा, मॅट कुह्नमन, मार्नस लाबुशेन, नाथन लायन, लांस मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ (कर्णधार), मिचेल स्टार्क, मिशेल स्वेपसन.